‘निमा इंडेक्स’ प्रदर्शनाचा समारोप
By Admin | Updated: April 27, 2015 23:50 IST2015-04-27T23:49:17+5:302015-04-27T23:50:00+5:30
‘निमा इंडेक्स’ प्रदर्शनाचा समारोप

‘निमा इंडेक्स’ प्रदर्शनाचा समारोप
सातपूर : ‘मेक इन इंडिया’चा संदेश देत गेल्या चार दिवसांपासून भरविण्यात आलेल्या ‘निमा इंडेक्स २०१५’ या औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप झाला. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील ठक्कर मैदानावर निमाच्या वतीने इंडेक्स २०१५ औद्योगिक प्रदर्शन २४ ते २७ एप्रिल दरम्यान भरविण्यात आले होते. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजितसिंग, सिमेन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील माथुर, महाराष्ट्र बॅँकेचे कार्यकारी संचालक आर. आत्माराम, तसेच निमाचे अध्यक्ष एच. बी. थॉण्टेश, उपाध्यक्ष संजीव नारंग, मधुकर ब्राह्मणकर, मंगेश पाटकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी एचएएलचे दलजीतसिंग यांना सांगितले की, एचएएलने धोरणात्मक निर्णय घेऊन नाशिकच्या लघुउद्योजकांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. परंतु नाशिकच्या उद्योजकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामानाने बंगरूळू, हैदराबाद, पुणे, नोयडा येथील लघुउद्योजकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. नाशिकच्या लघुउद्योजकांनी आपल्या कुवतीप्रमाणे एचएएलसाठी कॉम्पोनंटचा पुरवठा करण्याचे आवाहन केले.
सिमेन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील माथुर यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून, अजून सक्षम करण्यासाठी उद्योजकांनी जागतिक दर्जाचे दर्जेदार उत्पादन निर्मितीकडे लक्ष दिले पाहिजे. भारतीय उद्योजकांनी जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष रवि वर्मा यांनी केले. औद्योगिक प्रदर्शनाची सविस्तर माहिती इंडेक्स समितीचे अध्यक्ष एच. बी. थॉण्टेश यांनी दिली. स्नेहा ओक आणि समीर परवा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निमा डिरेक्टरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महिंद्र अॅण्ड महिंद्रचे हिरामण अहेर, तसेच संतोष मंडलेचा, सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे, व्हिनस वाणी, सुधाकर देशमुख, शैलेश नारखेडे, उदय खरोटे, हर्षद ब्राह्मणकर, संदीप सोनार, मिलिंद राजपूत, भरत येवला, उमेश कोठावदे, विवेक पाटील आदिंसह उद्योजक निमा पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)