निमा निवडणुकीतील चुरस वाढली

By Admin | Updated: July 26, 2016 00:26 IST2016-07-26T00:26:04+5:302016-07-26T00:26:27+5:30

लढत अटळ : बिनविरोध उमेदवारांसाठी दोन्ही पॅनलचा दावा

NIMA elections increased steal | निमा निवडणुकीतील चुरस वाढली

निमा निवडणुकीतील चुरस वाढली

सातपूर : निमाच्या निवडणुकीत समेट होत नसल्याने सरळ सरळ दोन पॅनलमध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पॅनल तयार होण्यापूर्वी सात जागांवर बिनविरोध निवड झालेले उमेदवार आमच्याच पॅनलचे आहेत, असा दावा दोन्ही पॅनलकडून केला जात असल्याने बिनविरोध झालेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. कारण हे उमेदवार पूर्वी कोणत्याही पॅनलचे नसल्याने या उमेदवारांना आपण नेमक्या कोणत्या पॅनलचे आहोत, याचे स्पष्टीकरण आता द्यावे लागत आहे.
निमा निवडणुकीत माघारीच्या पूर्वसंध्येला अचानक विरोधी पॅनल तयार झाले आहे. त्यात एकता आणि प्रगती अशा दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. पूर्वी एकता हे एकच पॅनल असल्याने उमेदवारी अर्ज भरताना उमेदवार एकच पॅनलचे होते. नंतर प्रगती पॅनलची निर्मिती झाली आहे. त्याच उमेदवारांची विभागणी झाली आहे.
माघारीपूर्वी सात जागांवर बिनविरोध निवड झाली होती. परंतु मतभेद झाल्याने दोन पॅनलमध्ये निवडणूक होणार असल्याने दोन्हीकडून प्रचारास जोरदार प्रारंभ करण्यात आला आहे. बिनविरोध झालेले उमेदवार आमच्याच पॅनलचे आहेत, असा दावा दोन्ही पॅनलकडून केला जात आहे. दोन्ही पॅनलच्या प्रचार पत्रकात या उमेदवारांची छबी (फोटो) झळकले आहेत. (वार्ताहर)

Web Title: NIMA elections increased steal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.