निमा निवडणूक अखेर बिनविरोध

By Admin | Updated: July 24, 2014 01:03 IST2014-07-24T00:13:35+5:302014-07-24T01:03:56+5:30

नाट्यमय घडामोडी : अध्यक्षपदी रवि वर्मा, सरचिटणीस मंगेश पाटणकर

Nima election finally elected unopposed | निमा निवडणूक अखेर बिनविरोध

निमा निवडणूक अखेर बिनविरोध

सातपूर : दिवसभर सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर दोन्ही गटांत समेट घडून आल्याने अखेर निमा निवडणूक बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले. अध्यक्षपदी रवि वर्मा, तर सरचिटणीसपदी मंगेश पाटणकर यांची निवड जाहीर करण्यात आली.
निमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटामध्येच फूट पडल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली होती. दुपारपर्यंत दोन्ही गटांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केल्यामुळे चुरस निर्माण झाली होती. मधुकर ब्राह्मणकर, संतोष मंडलेचा, विवेक पाटील, विजय तलवार, मनीष कोठारी, एन. टी. अहेर, सुरेश माळी, नरेंद्र हिरावत, धनंजय बेळे, राजेंद्र छाजेड, दीपक राठी आदिंनी मध्यस्थी करीत दोन्ही गटांच्या उमेदवारांना स्थान देऊन निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळविले. बिनविरोध निवडीसाठी नेत्यांच्या दोन दिवस सतत बैठका सुरू होत्या.
निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. के. भुतानी, जे. एम. पवार, विवेक गोगटे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. त्यात अध्यक्षपदी रवि वर्मा, सरचिटणीसपदी मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष (मोठा गट)- के. एल. राठी, उपाध्यक्ष (लघु गट)- संजीव नारंग, सहसचिव (मोठा गट)- सी. डी. कुलकर्णी, (लहान गट) प्रदीप बूब, खजिनदारपदी विरल ठक्कर, तर कार्यकारिणी सदस्यपदी व्हिनस वाणी, संजय सोनवणे, अखिल राठी, अनिल बाविस्कर, मनीष रावल, शशिकांत जाधव, श्रीकांत नावंदर, उदय रकिबे, सुधाकर देशमुख, कुरेश बादशाह, भरत येवला, तेजपाल बोरा, हर्षद ब्राह्मणकर, रजतकुमार गांधी, मिलिंद राजपूत, राजेंद्र वडनेरे, सतीश कोठारी, शैलेश नारखेडे, सौ. अरुणा जाधव, विजयकुमार गुप्ता यांचा समावेश आहे. सिन्नर तालुका उपाध्यक्षपदी अरुण चव्हाणके, अतिरिक्त सचिवपदी आशिष नहार, कार्यकारिणी सदस्यपदी किरण जैन, सुधीर बडगुजर, संदीप भदाणे, एस. के. नायर, नारायण पाटील, उत्तम दोंदे आदिंचा समावेश आहे. (वार्ताहर)

Web Title: Nima election finally elected unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.