नीलवसंत फाउंडेशन नेत्रशिबिरास प्रतिसाद
By Admin | Updated: April 5, 2016 23:21 IST2016-04-05T22:33:39+5:302016-04-05T23:21:57+5:30
नीलवसंत फाउंडेशन नेत्रशिबिरास प्रतिसाद

नीलवसंत फाउंडेशन नेत्रशिबिरास प्रतिसाद
नाशिक : स्व. डॉ. वसंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त देवळाली गाव येथील राम मंदिरात आयोजित मोफत नेत्र तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया व मोफत आरोग्य तपासणी शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, त्र्यंबकराव गायकवाड, बाबा सदाफुले, मनोहर कोरडे, डॉ. पेखळे आदि उपस्थित होते. डॉ. प्राची पवार यांनी प्रास्तविक केले. त्यांनी यावेळी नीलवसंत फाउंडेशनतर्फे देवळाली गावामध्ये मालधक्का व गवळीपाडा येथे वर्षभर राबविलेल्या आरोग्य शिबिरांची माहिती दिली. गायकवाड यांनी आपल्या भाषणातून स्व. डॉ. वसंत पवार यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. बाबा सदाफुले यांनीही मनोगत व्यक्त केले. अमित चुंबळे यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्तकेला.