नीलिमा पवार यांना राज्यस्तरीय संस्थापालक पुरस्कार
By Admin | Updated: July 24, 2016 23:00 IST2016-07-24T22:58:01+5:302016-07-24T23:00:13+5:30
नीलिमा पवार यांना राज्यस्तरीय संस्थापालक पुरस्कार

नीलिमा पवार यांना राज्यस्तरीय संस्थापालक पुरस्कार
गौैरव : मविप्रसाठी केलेल्या प्रयत्नांची दखलनाशिक : आंतरराष्ट्रीय पालक दिनाचे औचित्य साधून ‘डीपर व सर फाउंडेशन’ या संस्थांतर्फे डीपरच्या दशकपूर्तीच्या निमित्त राज्यस्तरावरील आदर्श संस्थापालक प्रथम पुरस्कार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांना प्रदान करण्यात आला.
नीलिमा पवार या संस्थेच्या पहिल्या महिला सरचिटणीस असून, संस्थापातळीवर विविध उपक्र मांतून संस्थेसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुणे शहरातील कोथरुड परिसरातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशनच्या जे. पी. नाईक सेंटर येथे संगणकतज्ज्ञ व संशोधक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पवार भारत स्काउट-गाइड संस्थेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम करीत आहे. (प्रतिनिधी)