नृत्यानुष्ठानमध्ये आज नीलिमा हिरवे, मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:27 IST2018-02-11T01:27:03+5:302018-02-11T01:27:03+5:30

नाशिक : नृत्यानुष्ठान या मालिकेत रविवारी (दि. ११) नीलिमा हिरवे आणि पंडित विजय शंकर यांच्या शागिर्द शीला मेहता यांचा नृत्याविष्कार होणार आहे.

Nilima Hirave, Mehta today in the dance form | नृत्यानुष्ठानमध्ये आज नीलिमा हिरवे, मेहता

नृत्यानुष्ठानमध्ये आज नीलिमा हिरवे, मेहता

नाशिक : कीर्ती कलामंदिर संस्थेच्या वतीने आयोजित नृत्यानुष्ठान या मालिकेत रविवारी (दि. ११) डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या शिष्या नीलिमा हिरवे आणि पंडित विजय शंकर यांच्या शागिर्द शीला मेहता यांचा नृत्याविष्कार सायंकाळी ६.३० वाजता प. सा. नाट्यगृह येथे होणार आहे. संस्थेच्या वतीने दर महिन्याच्या दुसºया रविवारी नृत्यानुष्ठान या मैफलीचे आयोजन केले जाते. रविवारी सहावे पुष्प गुंफले जाणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कीर्ती कलामंदिर संस्थेच्या संचालक रेखा नाडगौडा यांनी केले आहे.

Web Title: Nilima Hirave, Mehta today in the dance form

टॅग्स :danceनृत्य