कळवण रोटरीच्या अध्यक्षपदी नीलेश भामरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST2021-07-04T04:10:49+5:302021-07-04T04:10:49+5:30

हरी ओम लाॅन्स येथील सभागृहात क्लबच्या पदाधिकारी निवडीच्या बैठकीत नीलेश भामरे व संभाजी पवार यांच्या नावाला सर्वानुमते ...

Nilesh Bhamre as the President of Kalvan Rotary | कळवण रोटरीच्या अध्यक्षपदी नीलेश भामरे

कळवण रोटरीच्या अध्यक्षपदी नीलेश भामरे

हरी ओम लाॅन्स येथील सभागृहात क्लबच्या पदाधिकारी निवडीच्या बैठकीत नीलेश भामरे व संभाजी पवार यांच्या नावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. माजी प्रांतपाल विलास शिरोरे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ५ जुलै रोजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली नूतन अध्यक्ष व सेक्रेटरी यांचा पदग्रहण सोहळा कोविड-१९ नियमावली पाळून कळवण येथे संपन्न होणार आहे. रोटरी क्लब कळवणद्वारे विविध प्रकारची शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष नीलेश भामरे व सचिव संभाजी पवार यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी माजी अध्यक्ष राजेश मुसळे, जितेंद्र कापडणे, निंबा पगार, डॉ. आर. डी. भामरे, डॉ. एस. बी. सोनवणे, बापू कुमावत, हेमंत सोनवणे, प्रा. व्ही. डी. सोनवणे, डॉ. रवींद्र पगार, मोहनशेठ संचेती, गंगाधर गुंजाळ, गंगा पगार, प्रमोद सूर्यवंशी, डॉ. तुषार पगार, ॲड. भाऊसाहेब पवार, प्रवीण संचेती, संजय बगे, गालिब मिर्झा, अविनाश पगार आदी उपस्थित होते.

Web Title: Nilesh Bhamre as the President of Kalvan Rotary