निकम खून प्रकरणातील संशयित ताब्यात
By Admin | Updated: May 19, 2017 16:12 IST2017-05-19T16:12:31+5:302017-05-19T16:12:31+5:30
परिसरात तणाव : पूर्व वैमनस्यातून हत्या; सात-आठ मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

निकम खून प्रकरणातील संशयित ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : पंचवटीतील माजी नगरसेवक चंद्रकांत निकम यांचा पुतण्या किरण राहुल निकम (२९) याच्या हत्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी रात्री उशिरा एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या हत्येप्रकरणी म्हसरूळ येथे राहणारा मयताचा मावसभाऊ नितीन पगारे याने दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात सात ते आठ मारेकऱ्यांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.