निफाड @ ४.४
By Admin | Updated: January 23, 2016 23:49 IST2016-01-23T23:48:09+5:302016-01-23T23:49:03+5:30
निफाड @ ४.४

निफाड @ ४.४
निफाड : कडाक्याच्या थंडीने निफाडकर गारठले असून, शनिवारी तपमानात अजून घट झाली. कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४.४ अंश सेल्सिअस नीचांकी तपमानाची नोंद झाली आहे. बुधवारपासून थंडीचा जोर वाढला असून, बुधवारी ५.४, गुरुवारी ६, शुक्रवारी ५, शनिवारी ४.४ अंश सेल्सिअस तपमान निफाडचे नोंदविण्यात आले आहे. शनिवारी सकाळी निफाड तालुका थंडीने गारठला होता. थंडीमुळे सकाळच्या सुमारास तालुक्यात रस्त्यावर रहदारी कमी होती. थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतला. दुपारपर्यंत हवेत गारठा असल्याने नागरिकांनी उबदार कपडे परिधान केले होते. ऊसतोड कामगार सकाळी आठपर्यंत तात्पुरत्या झोपड्याच्या वसाहतीजवळ शेकोट्या करून ऊब मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. तपमानात घट होत असल्याने द्राक्षाच्या फुगवण झालेल्या द्राक्ष मण्यांना तडे जाण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. थंडीमुळे सकाळी चहाच्या टपऱ्यांवर गर्दी दिसून येत आहे..