निफाडला पारा घसरला; तपमान ७ अंश सेल्सिअस
By Admin | Updated: December 22, 2015 23:10 IST2015-12-22T23:08:52+5:302015-12-22T23:10:23+5:30
निफाडला पारा घसरला; तपमान ७ अंश सेल्सिअस

निफाडला पारा घसरला; तपमान ७ अंश सेल्सिअस
निफाड : तालुक्यातील तपमानात लक्षणीय घट झाली असून, येथे मंगळवारी ७ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीने तालुका गारठला आहे. तालुक्यात गेल्या आठवड्यात ९ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती; मात्र त्यापेक्षाही पारा घसरल्याने या हंगामातील मंगळवारी येथे नीचांकी तपमानाची नोंद झाली. त्यामुळे संपूर्ण तालुका गारठला असून, शेत परिसरासह विविध ठिकाणी दिवसभर शेकोट्या पेटवून नागरिकांनी ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला. तर अनेक विद्यार्थ्यांनी थंडीमुळे शाळेला दांडी मारल्याने शाळांमधील उपस्थिती विरळ दिसून आली.