निफाडला पाणीदूतांचा सत्कार
By Admin | Updated: September 3, 2016 23:10 IST2016-09-03T23:09:14+5:302016-09-03T23:10:42+5:30
स्वागतार्ह : निफाड नगरपपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांसह काही नागरिकांचा सन्मान

निफाडला पाणीदूतांचा सत्कार
निफाड : शहरात यावर्षी ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या उभी राहिली असताना निफाड शहरातील काही शेतकरी व नागरिकांनी पाणीदूत बनून आपल्या विहीर व कूपनलिकेचे पाणी देऊन निफाड नगरपंचायतीला सहकार्य करून सेवाभावी वृत्ती दाखविणाऱ्या या सर्वांचा सत्कार निफाड नगरपंचायतच्या वतीने करण्यात
आला.
याप्रसंगी व्यासपीठावर निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, उपनगराध्यक्ष सुनीता कुंदे, नगरसेवक आनंद बिवालकर , अनिल कुंदे , जावेद शेख, मुकुंद होळकर, दिलीप कापसे, देवदत्त कापसे, एकनाथ तळवाडे, संदीप जेउघाले, स्वाती गाजरे, चारुशीला कर्डिले, नयना निकाळे, मंगल वाघ, नूरजहाँ पठाण, लक्ष्मीबाई पवार, अलकाबाई पवार, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय कुंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
ऐन उन्हाळ्यात कादवा नदीपात्र कोरडे झाल्याने निफाडमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर निफाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, उपनगराध्यक्ष सुनीता कुंदे व सर्व सहकाऱ्यांनी निफाडमधील शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरीचे, कूपनलिकेचे पाणी नगरपंचायतीच्या पाइपलाइनला जोडून देण्याची विनंती केली. ही विनंती तत्काळ मान्य करीत या शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीचे, कूपनलिकेचे पाणी दिले, तर काहींनी पाण्याची वाहतूक करण्यासाठी आपल्या शेतातील पाइपलाइन उपलब्ध करून दिल्या. त्यांनी केलेल्या मदतीला निफाडकरांनी खरोखर सलाम केला आहे.
उर्वरित ज्या शेतकरी व नागरिक यांनी विहीर व कूपनलिकेचे पाणी दिले, त्या दानशूर शेतकऱ्यांत अंबादास गोळे, भाऊसाहेब कापसे, साहेबराव जाधव, निफाड पंचायत समितीचे सभापती, सुभाष कराड, सुरेश कराड, जगन्नाथ सांगळे, गोपाळा गाजरे, अजय गोळे, माजी सरपंच नानासाहेब होळकर, प्रवीण गोळे, विजय गोळे, पापा पटेल, भागवत गोळे, योगेश कुंभार्डे, लक्ष्मण गाजरे, श्रीकांत खडताळे, महेश जंगम, युवराज काळे, बाळासाहेब कापसे, बाळासाहेब कुंभार्डे, गोविंद गाजरे, बाळासाहेब संधान, नामदेव कापसे, राजेंद्र कापसे, बाळासाहेब जंगम, रावसाहेब कुंदे, निफाड अर्बनचे संचालक रामदास व्यवहारे,
सोमनाथ गोळे, स्वप्नील गोळे, मधुकर व्यवहारे, परमानंदगिरी गोसावी, कुशारे, वीज मंडल आदि मान्यवरांचा समावेश होता. या सर्वांचा नगरपंचायतने सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद होळकर यांनी
केले. (वार्ताहर)