निफाडला भागवत कथा सोहळा संपन्न

By Admin | Updated: January 18, 2016 22:33 IST2016-01-18T22:31:48+5:302016-01-18T22:33:08+5:30

निफाडला भागवत कथा सोहळा संपन्न

Nifadala completes Bhagwat story ceremony | निफाडला भागवत कथा सोहळा संपन्न

निफाडला भागवत कथा सोहळा संपन्न

निफाड : आपण ईश्वराच्या दर्शनासाठी किती आतुर आहोत, दर्शनाची भूक आपल्याला किती तीव्र आहे त्या तीव्रतेने ईश्वर आपल्याला भेटतो. संत तुकाराम महाराजांना १५ दिवसात विठ्ठलाची भेट झाली, तर ध्रुवबाळाला ४ महिन्यात परमेश्वराने दर्शन दिले, असे प्रतिपादन भागवताचार्य भगवान जोशी यांनी निफाड येथील विठ्ठल मंदिरात आयोजित भागवत कथेप्रसंगी केले.
येथील इंद्रभान रायते व परिवार आणि आर्ट आॅफ लिव्हिंग, येथील विठ्ठल मंदिर ट्रस्ट, वंदे मातरम् ग्रुप यांनी या कथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी जोशी पुढे म्हणाले की, भागवत कथा ऐकल्याने पुण्यप्राप्ती तर होतेच शिवाय जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन मिळते. आजची तरुणाई आईला मम्मी म्हणतात. इंग्रजीत ममी या शब्दाचा अर्थ शव असा आहे. जी आई आपल्यावर संस्कार करते तिला आपण मम्मी म्हणणे कितपत योग्य आहे, याचा आपण विचार करावा. आई शब्दात जो गोडवा आहे तो इतर कोणत्याही शब्दात नाही. इंग्रजी शिक्षण घेण्यास हरकत नाही पण संस्कार मात्र आपलेच असावे, कारण भारतीय संस्कृती जगाला वंद्य आहे.
या कथा सोहळ्याचा निफाड व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेत आहेत. अ‍ॅड. इंद्रभान रायते, तुषार पगार, प्रकाश सुराणा, साहेबराव क्षीरसागर आदि मान्यवरांच्या हस्ते भागवताची आरती झाली. भागवताचार्य सानेंद्र चतुर्वेदी, कारभारी चिकटगावकर, लोनजाई आश्रमचे गोविंददास लगड, नगरसेवक मुकुंद होळकर, सुभाष कर्डिले, अ‍ॅड. श्रीकांत रायते, विक्रम रंधवे, उगलेबाबा, पुरु षोत्तम कायस्थ, संजय कुंदे, अ‍ॅड. रामेश्वर कोल्हे, अ‍ॅड. निकम आदि मान्यवरांसह भाविक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Nifadala completes Bhagwat story ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.