मामाच्या लैंगिक छळाला कंटाळून भाचीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:15 IST2021-05-13T04:15:48+5:302021-05-13T04:15:48+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (दि. २) रोजी मृत मुलीचा मामा संशयित अजय कुमार याने तिच्या भाचीला, ‘तुझ्या आईची तब्येत ...

मामाच्या लैंगिक छळाला कंटाळून भाचीची आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (दि. २) रोजी मृत मुलीचा मामा संशयित अजय कुमार याने तिच्या भाचीला, ‘तुझ्या आईची तब्येत खराब झाली असून तिला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’ असे खोटे सांगून कोणाच्या तरी रूमवर घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेवले. यावेळी तिच्या भाचीने नकार दिला असता, संशयिताने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर ‘तू जर माझ्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले नाहीस, तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे पाथर्डी शिवारात शुक्रवार (दि. ७) रोजी राहत्या घरी सकाळी पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
स्वत:च्या भाचीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी संशयिताकडून वारंवार बळजबरी करण्याचा प्रयत्न केला जात होता व त्याला वेळोवेळी सांगून सुद्धा तो ऐकत नव्हता. मात्र सख्खा साला असल्यामुळे पोलीस ठाण्यात यापूर्वी आम्ही तक्रार दिली नव्हती, असे फिर्यादीच्या वडिलांनी म्हटले आहे. संशयित आरोपीचा मोबाईल तपासला असता, व्हिडिओ व मोघम स्वरूपाचे चॅटिंगआधारे सदर मामा भाचीला त्रास देत होता, असे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.