पुढचे संमेलन काश्मीरला घेतील! भालचंद्र नेमाडे यांचा टोला

By Admin | Updated: April 6, 2015 00:40 IST2015-04-06T00:39:57+5:302015-04-06T00:40:25+5:30

पुढचे संमेलन काश्मीरला घेतील! भालचंद्र नेमाडे यांचा टोला

Next meeting will take Kashmir! Bhalchandra Nemade | पुढचे संमेलन काश्मीरला घेतील! भालचंद्र नेमाडे यांचा टोला

पुढचे संमेलन काश्मीरला घेतील! भालचंद्र नेमाडे यांचा टोला

  नाशिक : ‘साहित्य संमेलने हा रिकामटेकड्यांचा उद्योग’ अशी टीका करणाऱ्या ‘ज्ञानपीठ’ विजेत्या भालचंद्र नेमाडे यांनी घुमानच्या संमेलनावरूनही महाराष्ट्र साहित्य परिषदेला टोला लगावला आहे. ‘हे पुढचे संमेलन जम्मू-काश्मीरलाही घेतील’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली. नाशकात एका कार्यक्रमात बोलताना जात-धर्म, इतिहास व भाषा यासंदर्भात विवेचन करताना एक धागा पकडून नेमाडे म्हणाले की, एका मराठी प्रजातीची दहा-बारा घरे काश्मीरला असून, त्यामुळे कदाचित पुढचे संमेलन जम्मू-काश्मीरला घेतले जाईल. साहित्य परिषदांना मराठी माणसाचा नुसता वास आला, तरी तिथे संमेलने घेतात. जात-धर्माच्या व्यवस्थेचे समर्थन करताना त्यांनी धर्मनिरपेक्षवाद्यांवरही कडाडून टीका केली. हे लोक जातिअंताच्या गोष्टी करतात आणि स्वत: मात्र वरच्या जातीच्या मुलीशी लग्न करतात. म्हणजे जातीचा वेगळ्या अर्थाने अंतही होतो आणि बायकोही मनासारखी मिळते. जात-धर्माची व्यवस्था सरसकट वाईट म्हणणे चुकीचे असून, या रचनेत राहूनच सुधारणा करायला हव्यात, असे मतही त्यांनी मांडले.

Web Title: Next meeting will take Kashmir! Bhalchandra Nemade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.