मालेगावी दुसऱ्या दिवशीही शंभर अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 17:45 IST2019-01-23T17:44:58+5:302019-01-23T17:45:45+5:30
मालेगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसºया दिवशी अतिक्रमण हटाव मोहिम राबवित नवीन बसस्थानक परिसर, नंदन टॉवर जवळील सुमारे शंभर अतिक्रमणे हटविली आहेत.

मालेगावी दुसऱ्या दिवशीही शंभर अतिक्रमण हटविले
बुधवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात करण्यात आली. मंगळवारी किदवाईरोड भंगारबार परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले होते. बुधवारी ही मोहिम सुरू ठेवण्यात आली होती. शहरातील नंदन टॉवर, मिलन हॉटेल, नवीन बसस्थानक समोरील अतिक्रमण हटविण्यात आले. जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अतिक्रमण हटवून सामान जप्तीची कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण अधीक्षक दीपक हातगे, प्रभाग अधिकारी किशोर गिडगे, बीटमुकादम उपस्थित होते.