शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या व्हॉटसअपवर सॉरीचा मेसेज पाठवून नवविवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 17:03 IST

नाशिक : पतीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर मला माफ कराल काय व सॉरी असा संदेश पाठवून अवघ्या सात महिन्यांपुर्वीच विवाह झालेल्या सव्वीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़३१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सातपूरजवळील तिरडशेतच्या भावले मळ्यात घडली़

ठळक मुद्देतिरडशेतमधील घटना : सात महिन्यांपुर्वी विवाह सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद

नाशिक : पतीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर मला माफ कराल काय व सॉरी असा संदेश पाठवून अवघ्या सात महिन्यांपुर्वीच विवाह झालेल्या सव्वीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़३१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सातपूरजवळील तिरडशेतच्या भावले मळ्यात घडली़

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिरडशेत येथील भावले मळ्यातील उमेश सुकदेव भावले (२९) यांचा मे २०१८ मध्ये निलिमा (२६) सोबत विवाह झाला होता़ सोमवारी सकाळी साअट वाजेच्या सुमारास उमेश भावले हे सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या हार्डवेअर दुकानात गेले होते़ सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी निलीमा हिने त्यांच्या मोबाईलवरील व्हॉटसअपवर मला त्रास होतो, मला माफ कराल काय व सॉरी असा मेसेज केला़

तेव्हा उमेश यांनी मेसेज करून त्रास करून घेऊ नकोमी लगेच घरी आलो असे सांगून पंधरा मिनिटात साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी पोहोचले असता त्यांचा बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता़ जोरजोरात आवाज देऊनहीे दरवाजा न उघडल्याने उमेश भावले याने भाऊ संदीप यास बोलावून दरवाजाच्या बिजागिरीचे स्क्रू खोलून पाहिले असता पत्नी निलिमा हिने बेडरुममधील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले़

दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे़कौटुंबिक कलहसात महिन्यांपुर्वीच उमेश व निलीमा यांचा विवाह झालेला होता़ घरात कौटुंबिक कलह सुरू असल्याचे आतापर्यंतच्या तपासावरून समोर आले असून निलीमा भावले हिच्या आत्महत्येचे निश्चित कारण समोर आलेले नाही़ तसेच याबाबत सखोल तपास करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल़- राजेंद्र कुटे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सातपूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस