हनुमंतपाडा येथील नवविवाहितेची आत्महत्त्या

By Admin | Updated: December 27, 2015 23:17 IST2015-12-27T23:12:46+5:302015-12-27T23:17:37+5:30

हनुमंतपाडा येथील नवविवाहितेची आत्महत्त्या

Newly-married Suicide in Hanumantapada | हनुमंतपाडा येथील नवविवाहितेची आत्महत्त्या

हनुमंतपाडा येथील नवविवाहितेची आत्महत्त्या


देवळा : तालुक्यातील हनुमंतपाडा येथील एका नवविवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.
बागलाण तालुक्यातील राजश्री अजित रणधीर (२४) यांचे देवळा तालुक्यातील हनुमंतपाडा येथील अजित रणधीर यांच्यासोबत दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर राजश्रीस तिच्या सारसच्यांकडून पिकअप गाडी घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्यास सांगण्यात येत
होते.
त्यासाठी तिचा सासरच्यांकडून छळही सुरु होता अशी तक्रार राजश्रीच्या माहेरच्यां फिर्यादी केदा मधूकर विसपुते यांनी पोलिसांकडे केली आहे.
त्यानंतर देवळा पोलिसांनी संशयीत आरोपी व राजश्रीचे सासरे रमेश रणधीर, सासू रत्ना रणधीर, नवरा अजीत रणधीर, दीर सुजीत रणधीर यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्त्या केल्याची फिर्याद दाखल केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Newly-married Suicide in Hanumantapada