Newcomers welcome in schools | शाळांमध्ये नवागतांचे स्वागत
शाळांमध्ये नवागतांचे स्वागत

नाशिकरोड : परिसरातील विविध शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करून त्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  प्राचार्या मनीषा विसपुते यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत विज्ञान प्रयोगशाळा व ७ डिजिटल वर्ग तयार करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक रमेशचंद्र औटे, अध्यक्ष मधुकरराव सातपुते, निंबाशेठ विसपुते, पुष्पलता औटे, निशा जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल औटे केले.
आचार्य आनंदऋषी शाळा
आर्टिलरी सेंटररोड येथील आचार्य आनंदऋषी शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करून खाऊचे वाटप करून स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थापक मोहनलाल चोपडा, सुनील चोपडा, प्रकाश कोठारी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका नीलिमा अवथनकर यांनी केले. सूत्रसंचालन उषा सानप व आभार माधुरी पानपाटील यांनी मानले.
अभिनव बालविकास मंदिर
जेलरोड येथील अभिनव बालविकास मंदिर व डीएफडी माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक, माध्यमिक विभागा प्रमुख वैशाली पाटील व शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले. शाळेचा परिसर फुगे व चित्रांनी सजविला होता. शालेय शिस्त व नियम याबाबत महेंद्र पाटील यांनी माहिती सांगितली. सूत्रसंचालन प्रतिभा बस्ते व आभार शोभा वाढवणे यांनी मानले. यावेळी शिक्षक, पालक, कर्मचारी उपस्थित होते.
रचना प्राथमिक विद्यालयात नवागतांचे स्वागत
महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित रचना प्राथमिक विद्यालयात नवागतांचे मोफत पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचे शिक्षकांसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. संस्थेचे कोषाध्यक्ष निरंजन ओक , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रमोद शिरोदे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक बाविस्कर आदी उपस्थित होते. शाळेत रांगोळ्या काढून, गुढ्या उभारून तोरणे बांधून तसेच फुगे व पताकांनी आकर्षक सजावट करण्यासोबतच शाळेत नव्याने दाखल होणाºया विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करणयात आले. यावेळी अतिथींनी विद्यार्थ्यांना दूरदर्शनपासून दूर राहून शालेय शिक्षणातून अधिकाधिक ज्ञान संपादन करण्याचा सल्ला दिला. मुख्याध्यापक शीतल पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दीपक पवार, मनीषा येवला, भगवंत गावंडे, हेमंत पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
नासाका विद्यालयात पाठ्यपुस्तकांचे वाटप
नाशिकरोड : नासाका माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून शरद शिंदे होते. यावेळी सुधाकर गोडसे, सुरेश दळवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद दशरथ आडके, मुख्याध्यापक शंकर पिंगळे उपस्थित होते.  पाहुण्यांच्या हस्ते दहावीत शाळेत प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेले तेजस आडके, आकांक्षा सोनवणे, माउली तनपुरे, निकिता कानमहाले, पंकज टिळे यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पाठ्यपुस्तके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक, कर्मचारी उपस्थित होते.


Web Title:  Newcomers welcome in schools
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.