नववर्ष स्वागत तयारी मद्यपींवर करडी नजर
By Admin | Updated: December 31, 2015 23:56 IST2015-12-31T23:47:37+5:302015-12-31T23:56:29+5:30
नववर्ष स्वागत तयारी मद्यपींवर करडी नजर

नववर्ष स्वागत तयारी मद्यपींवर करडी नजर
नाशिकरोड : परिसरामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी युवा वर्गामध्ये विशेष उत्साह दिसून येत होता. नववर्षाच्या स्वागतानिमित्त हॉटेल, बिअरबार आदिंना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर सायंकाळपासून मद्यपींवर करडी नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून तपासणी करण्यात येत होती.
मावळते वर्ष व नववर्षाचा प्रारंभ हा गुरुवारी आल्याने नेहमीपेक्षा यंदा नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांची संख्या रोडावली होती. युवावर्ग, कामगार, नोकरदार वर्ग आदि वेगवेगळ्या ग्रुपने नववर्षाच्या स्वागताचे खासगी ठिकाणी नियोजन केल्याचे चित्र दिसत होते. वादविवाद किंवा कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये याची विशेष खबरदारी घेण्याकडे बहुतेकजणांचा कल दिसून येत होता. परिसरामध्ये व गावाबाहेरील ज्या हॉटेलमध्ये विना परवाना (सर्रासपणे) दारू विकली जाते किंवा बाहेरून आणलेली दारू पिऊ दिली जाते असे सर्व धाबे पोलिसांनी गुरुवारी बंद ठेवण्यास भाग पाडले होते. तसेच अंडाभुर्जीचे गाडे, चायनीज खाद्य पदार्थ विक्रीची दुकानेदेखील पोलिसांनी बंद ठेवली होती.
नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने हॉटेल, बिअर बार यांना विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. काही हॉटेल्समध्ये डीजे, आॅर्केस्ट्रा आदिंचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळपासून पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली होती. (प्रतिनिधी)