गुढीपाडवा : शाही मिरवणुका; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलनाशिक : भल्या पहाटे नऊवारी साडी, फेटे, नाकात नथ, शृंगारासह मराठमोळेपण मिरवत सज्ज झालेल्या सुवासिनी, त्यांना पारंपरिक पद्धतीतील धोतर, झब्बा, फेटे, हाती भगव्या झेंड्यांसह साथ देणारे पुरुष, सजवलेले चित्ररथ, दुचाकी वाहनांचे शिस्तबद्ध संचलन, बेभान होऊन ढोल-ताशांचे होत असलेले वादन अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शहरात सर्वत्र स्वागतयात्रांद्वारे नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सातपूर, सिडको, पंचवटी, नाशिकरोड, इंदिरानगर आदि जवळपास सर्वच शहरांतील विविध मंडळांकडून शोभायात्रा काढण्यात आल्या. दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे सकाळी गोरक्षनगर मंदिर परिसरातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत गुलालवाडी येथील ढोल पथक सहभागी झाले होते. ढोल-ताशाच्या गजरात शोभायात्रेला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता गोरक्षनगर येथे शोभायात्रेची सांगता झाली. साडेदहा वाजता गुढी उभारणी सोहळा व त्यानंतर ११ वाजता दुष्काळ व पाणीटंचाईवर जलसंरक्षक डॉ. राजेंद्रसिंह व सिनेकलावंत चिन्मय उदगीरकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले.
स्वागतयात्रांद्वारे नववर्षाचे स्वागत
By admin | Updated: March 28, 2017 23:37 IST