चाळीत टिकणारे कांद्याचे नवीन वाण
By Admin | Updated: January 11, 2017 22:43 IST2017-01-11T22:43:17+5:302017-01-11T22:43:38+5:30
चितेगाव : राष्ट्रीय बागवानी संशोधन केंद्रात झाले संशोधन; कमी कालावधीत जास्त उत्पादन

चाळीत टिकणारे कांद्याचे नवीन वाण
निफाड : चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान प्रतिष्ठानने वाढीव उत्पादन, साठवण क्षमता असलेले कांद्याचे लाल ४ - (एल -७४४) हे नवीन वाण विकसित केले. या नवीन कांद्याच्या वाणाबाबत या संशोधन केंद्राचे सहायक संचालक डॉ आर. के. सिंग यांनी माहिती देताना सांगितले की, या नवीन वाणाचे खरीप, उशिरा खरीप, रब्बी या तीनही हंगामात घेतले जाते. हे पीक महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात घेतले जाते. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात कांदा पीक तिन्ही हंगामात घेतले जाणार आहे. भारत, मुख्य कांदा उत्पादक देश असून, निर्यातही मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात १.१९ दशलक्ष हेक्टर पासून १९,३५ दशलक्ष टन कांदा उत्पादित होतो. नाशवंत पीक असल्याने कांदा खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करून जास्त उत्पादन क्षमता आणि जास्त काळ साठवून ठेवता येईल अशा नवीन वाणाची निर्मिती चितेगाव येथील विकास प्रतिष्ठानने केली आहे.
या नवीन वाणाची पात सरळ उभी हिरावीगडद दिसेल. कांद्याचा रंग गडद लाल, गोलाकृती गोल आकार, पातळ मान आणि ५.५ -६.५० सें.मी. कांद्याचा व्यास आहे. २० कांद्याचे सरासरी वजन १.५०-१.७० किलो असेल. कापणी झाल्यानंतर कांदा फार मजबूत असेल. कांद्याच्या लागणीनंतर ११५-१२० दिवसात हे पीक तयार होईल. विशेष म्हणजे कांद्यावर येणारा जांभळा अंगावरील डाग सारख्या रोगाला प्रतिकारक असे हे रोप आह.े एका एकराला या वाणाचे ७ ते८ किलो बियाणे लागेल. एकरी१६० क्विंटलच्या आसपास त्याचे उत्पादन मिळेल. हे नवीन वाण पुढील खरीप उत्तरार्धात व रब्बी हंगामासाठी साधारण जुलै,आॅगस्ट मिहन्यात उपलब्ध करून दिले जाईल चितेगाव, लासलगाव, सिन्नर या अधिकृत केंद्रांशिवाय अधिकृत डीलरांकडे हे बियाणे उपलब्ध असेल असे सिंग यांनी सांगितले. (वार्ताहर)