नूतन पोलीस ठाणे प्रमुखांचे ‘चेन स्नॅचिंग’ने स्वागत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST2021-09-07T04:18:38+5:302021-09-07T04:18:38+5:30

--इन्फो-- ...या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरी आयुक्तालयातील इंदिरानगर, म्हसरूळ, पंचवटी, सरकारवाडा, उपनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या ...

New Thane Police Chief Welcomed by 'Chain Snatching'! | नूतन पोलीस ठाणे प्रमुखांचे ‘चेन स्नॅचिंग’ने स्वागत!

नूतन पोलीस ठाणे प्रमुखांचे ‘चेन स्नॅचिंग’ने स्वागत!

--इन्फो--

...या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरी

आयुक्तालयातील इंदिरानगर, म्हसरूळ, पंचवटी, सरकारवाडा, उपनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या लागोपाठ प्रत्येकी एक अशा पाच घटना घडल्या आहेत. प्रत्येक घटनेत नेहमीप्रमाणे दुचाकीस्वार चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य केले गेले. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. शहरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे पुन्हा एकदा कडक नाकाबंदी आणि पोलीस पेट्रोलिंगची मागणी जोर धरू लागली आहे.

--इन्फो--

‘खाकी’चा वचक संपुष्टात?

शहरात जबरी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. शहरात सोनसाखळी चोरी, घरफोड्या, वाहनचोरी, हाणामारी, खून यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागल्याने गुन्हेगारांवरील ‘खाकी’चा वचक संपुष्टात येऊ लागल्याचे उघडपणे बोलले जात आहे. कारण प्राणघातक हल्ले, खुनासारखे गंभीर गुन्हेही घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: New Thane Police Chief Welcomed by 'Chain Snatching'!