शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकतेवर नवीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:21 IST

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच उद्योजकता या विषयावर नवीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. उद्योजकतेला वाव देऊन नवीन उद्योजक तयार करण्याचे ध्येय समोर ठेवून विद्यापीठाने ‘डिप्लोमा इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठीचे धडे देण्यात येणार असून, त्यासाठी विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइजेस विभागाने आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया यांच्यासोबत करार केला आहे.

ठळक मुद्देपुणे विद्यापीठ । सेंटर आॅफ इनोवेशनकडून प्रशिक्षण करारावर स्वाक्षरी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच उद्योजकता या विषयावर नवीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. उद्योजकतेला वाव देऊन नवीन उद्योजक तयार करण्याचे ध्येय समोर ठेवून विद्यापीठाने ‘डिप्लोमा इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठीचे धडे देण्यात येणार असून, त्यासाठी विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइजेस विभागाने आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया यांच्यासोबत करार केला आहे.विद्यापीठात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे संचालक मंडळ सदस्य मिलिंद कांबळे यांनी याबाबतच्या करारवर बुधवारी (दि.५) स्वाक्षऱ्या केल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइजेसच्या संचालिक डॉ. अपूर्वा पालकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम आदी उपस्थित होते. आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे महासंचालक डॉ. सुनील शुक्ला व त्यांचे सहकारी एस. बी. सरीन आणि डॉ. सत्य रंजन आचार्य हे आॅनलाइनच्या माध्यमातून यावेळी उपस्थित होते.अभ्यासक्रमांचे संपूर्ण शिक्षण आॅनलाइनविद्यापीठाकडून सुरू करण्यात आलेला पदव्युत्तर पदवीचा हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून, यात विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे शिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमांचे संपूर्ण शिक्षण आॅनलाइन असल्याची माहिती सेंटर आॅफ इनोवेशनच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण