नवीन चेहºयांच्या संधीने झाली ‘गच्छंती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:41 IST2017-08-06T01:39:57+5:302017-08-06T01:41:14+5:30
मराठा विद्या प्रसारक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलकडून सात विद्यमान संचालकांचे उमेदवारीचे पत्ते कापण्यात आले. अर्थात उमेदवारी कापण्यामागे या संचालकांवर भ्रष्टाचार अथवा नाकर्तेपणा नव्हे तर केवळ नवीन चेहºयांना संधी देण्याचे धोरण कारणीभूत असल्याची भावना या सात पैकी पाच उमेदवारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

नवीन चेहºयांच्या संधीने झाली ‘गच्छंती’
नाशिक : मराठा विद्या प्रसारक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलकडून सात विद्यमान संचालकांचे उमेदवारीचे पत्ते कापण्यात आले. अर्थात उमेदवारी कापण्यामागे या संचालकांवर भ्रष्टाचार अथवा नाकर्तेपणा नव्हे तर केवळ नवीन चेहºयांना संधी देण्याचे धोरण कारणीभूत असल्याची भावना या सात पैकी पाच उमेदवारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
नवीन चेहºयांना संधी देण्याचे असले तरी येवल्यातील ७५ वर्षांच्या ‘तरुणां’ना उमेदवारी मिळाली. नात्यागोत्याचा राजकारणात बळी गेल्याची भावना काहींनी व्यक्त केली आहे. विद्यमान सात संचालकांना सत्ताधारी प्रगती पॅनलने अर्धचंद्र देत नवीन चेहºयांना संधी देण्याचे धोरण अवलंबले होते. अर्धा डझनहून अधिक विद्यमान संचालकांना आणि तेही अनुभवी संचालकांना उमेदवारी नाकारणे तसे अवघड होते. त्यांना उमेदवारी नाकारल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर या सातपैकी पाच प्रमुख माजी संचालक व माजी पदाधिकाºयांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ही उमेदवारी नाकारण्याचे अनेक पैलू समोेर आले. मात्र नवीन चेहºयांसाठी अनुभवी चेहºयांनी थांबणे पसंत केले. उमेदवारी नाकारलेल्या काही माजी संचालकांनी प्रगतीच्या व्यासपीठावर जाणे टाळले. आता प्रत्यक्षात या थांबलेल्या उमेदवारांची प्रगती पॅनलला संपूर्ण जोमाने साथ लाभते की अंतर्गत नाराजीचा फटका बसतो, हे १४ आॅगस्टला मतमोजणीत कळेलच.