औषध निर्माण अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारिणी
By Admin | Updated: December 8, 2015 22:41 IST2015-12-08T22:40:11+5:302015-12-08T22:41:51+5:30
औषध निर्माण अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारिणी

औषध निर्माण अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारिणी
नाशिक : महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी फैयाज खान यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच जिल्ह्यास्तरीय अन्य कार्यकारिणीचीही निवड यावेळी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात राज्य कार्यकारिणीची बैठक राज्याचे कार्याध्यक्ष विजय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत जिल्हास्तरीय नूतन कार्यकरिणीची निवड एकमताने करण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्षपदी फैयाज खान, कार्यध्यक्षपदी हेमंत राजभोज, सरचिटणीसपदी सचिन अत्रे यांची निवड झाली.
अन्य कार्यकारिणीत पुढीलप्रमाणे खजिनदार भावसार, उपाध्यक्ष तुषार पगार, प्रमिला मुसळे, माधुरी पाटील, रफीक कादरी, सहसचिव संजय महाजन, जिल्हा संघटक सविता बागुल, नंदू पवार, बुलंद जगताप, मनोज अमृतकर, शिरीन मांडे, प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर कुलकर्णी, उमेश अग्रवाल, सहखजिनदार संतोष जाधव, सल्लागार राजेंद्र सोनार, महेश पैठणकर, जी. पी. खैरनार, अजित गायकवाड, श्री. चौधरी आदि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार झाला.
यावेळी राज्य कार्याध्यक्ष विजय देवरे यांनी संघटनेपुढील समस्या व सभासदांच्या अडचणी सोडविण्याबाबत राज्यस्तरावरून प्रयत्न केला
जाईल, असे आश्वासन दिले. तर खान यांनी जिल्हास्तरीय कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)