न्यु इंग्लिश स्कुलने राबविली मतदान जागृती मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:34 IST2019-03-27T17:34:20+5:302019-03-27T17:34:38+5:30
खेडलेझुंगे : रु ई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व ज्यु कॉलेजने मतदानाच महत्व जनमाणसांत रु जविण्याच्या उद्देशाने रु ई गावांत विद्यार्थ्यांनी फलक व घोषणांच्या माध्यमातुन मतदान जागृती मोहिम काढली.

न्यु इंग्लिश स्कुलने राबविली मतदान जागृती मोहिम
खेडलेझुंगे : रु ई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व ज्यु कॉलेजने मतदानाच महत्व जनमाणसांत रु जविण्याच्या उद्देशाने रु ई गावांत विद्यार्थ्यांनी फलक व घोषणांच्या माध्यमातुन मतदान जागृती मोहिम काढली.
प्राचार्य नंदकुमार देवढे यांच्या मार्गदर्शनानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो ! मतदान कर्तृत्वाचा धागा हो! अशा प्रकारचे फलक हातात घेत गावांत प्रभातफेरी काढुन मतदान जागृती केली.
मतदान जनजागृती फेरी यशस्वीतेसाठी पी. टी. धोंडगे, पी. बी. लोणारी, पी. एस. पाळंदे, श्रीमती पी. व्ही. काळे, एस. जे. पाडवी, जी. एन. तेलोरे, श्रीमती अश्विनी गवळी, आरती पोटे, निलम जाधव, मीरा शिंदे, पुनम उगले, विनोद गांवकर, लक्ष्मण डगळे, अशोक हिंगे, सुभाष गायकवाड आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.