शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शैक्षणिक धोरण : अंमलबजावणीपूर्वीच पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:59 IST

नवीन शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून, शिक्षणाचा आकृतिबंध बदलण्यात आला आहे. हे धोरण बालवाडी, अंगणवाडीपासून ते उच्च शिक्षणामध्ये लागू होणार असले तरी सध्याच्या परिस्थिती प्राथमिकपासून अलिप्त असलेले बालवाडी अथवा पूर्व प्राथमिकचे वर्ग प्राथमिक म्हणजेच पहिली, दुसरीच्या वर्गांना जोडले जाणार असल्याने या गटासाठी आवश्यक वर्गखोल्यांसह अन्य सोयी-सुविधा कशा उपलब्ध होणार? असा प्रश्न निर्माण झाला.

ठळक मुद्देनवीन शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्षनवीन धोरणात शिक्षणाचा आकृतिबंध बदललला

नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून, शिक्षणाचा आकृतिबंध बदलण्यात आला आहे. हे धोरण बालवाडी, अंगणवाडीपासून ते उच्च शिक्षणामध्ये लागू होणार असले तरी सध्याच्या परिस्थिती प्राथमिकपासून अलिप्त असलेले बालवाडी अथवा पूर्व प्राथमिकचे वर्ग प्राथमिक म्हणजेच पहिली, दुसरीच्या वर्गांना जोडले जाणार असल्याने या गटासाठी आवश्यक वर्गखोल्यांसह अन्य सोयी-सुविधा कशा उपलब्ध होणार? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वीच पायाभूत सुविधांची उभारणी करण्याची आवश्यकता असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. नवीन धोरणानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश आता औपचारिक शिक्षणात करण्यात आला आहे. बालकांची जडणघडण होण्याचा हाचकाळ महत्त्वाचा असतो, प्राथमिक स्तरावर भाषा, विज्ञान, वाचन, लेखन, गणित ते पायाभूत कौशल्ये विकासावर या नवीन धोरणात केलेला विचार हा भारताचे भविष्य घडविणार असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. तसेच सध्या बालवाडी आणि अंगणवाडी किंवा पहिली ते दुसरीपर्यंतच्या इंग्रजी शाळांचे पेव फुटलेले आहे. त्यांनाही काही अंशी चाप लागेल. परंंतु, या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ५+३+३+४  या नवीन सूत्राचा आणताना प्रथम पाचच्या गटात आधीच वर्गखोल्यांची असलेली उणीव कशी भरून काढली जाणार आहे. याविषयी कोणतीही स्पष्टता नसल्याने प्रथम पाचच्या गटातील विद्यार्थ्यांच्या एकत्रित शिक्षणासाठी स्वतंत्र पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी होणार की पूर्वीप्रमाणेच शिक्षणाचा सावळा गोंधळ यापुढेही सुरू राहणार याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याचे मत शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

या सुविधांची भासणार निकडसध्या प्राथमिक शाळांना आवश्यकतेच्या प्रमाणात वर्गखोल्या उपलब्ध नसल्याने पूर्व प्राथमिकचे वर्ग जोडताना अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता भासणार आहे. त्याचप्रमाणे तीन ते पाच वर्ष गटांतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतागृह यांसारख्या सुविधांची निकडही भासणार असून, या सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान शासकीय शाळांसमोर निर्माण होणार आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी