ललित रुंगठा ग्रुपतर्फे नवीन स्वप्न,नवीन ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST2021-02-12T04:14:35+5:302021-02-12T04:14:35+5:30

नाशिक : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इतरांसाठी एक मॉडेल तयार केले जाते. सुविधा मिळत असतील, तर नागरिक कर भरण्यासही तयार ...

New dream, new offer from Lalit Rungatha Group | ललित रुंगठा ग्रुपतर्फे नवीन स्वप्न,नवीन ऑफर

ललित रुंगठा ग्रुपतर्फे नवीन स्वप्न,नवीन ऑफर

नाशिक : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इतरांसाठी एक मॉडेल तयार केले जाते. सुविधा मिळत असतील, तर नागरिक कर भरण्यासही तयार असतात. परंतु तसा विश्वास जनमानसामध्ये तयार होणे महत्त्वाचे आहे. नाशिक शहरात आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळेच ललित रुंगठा ग्रुपतर्फे नवीन घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी नवीन ऑफर्स दिल्या आहेत.

ललित रुंगठा ग्रुपने शहरात गोविंदनगर येथे ‘मेरिडिअन’ थ्री बीएचके ४५.७६ लाख, गंगापूर रोड येथे ‘ओमकार’ प्रकल्पात टू बीएचके ३५.७१ लाख तर थ्री बीएचके ४३.४६ लाखामध्ये उपलब्ध आहे. येथे व्यावसायिकांसाठी गाळे देखील असून ३४.२७ लाखापासून उपलब्ध आहे. तर मखमलाबाद येथे ‘गुलमोहर’ टू बीएचके टेरेस ३०.७५ तर वन बीएचके २०.५७ लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर व्यावसायिकांसाठी भव्य शॉपिंग सेंटरची निर्मिती होत असून, ९.१० लाखात उपलब्ध आहे. याचबरोबर इंदिरानगर येथे ‘अयोध्या’ नावाने साकारलेल्या प्रोजेक्टमध्ये वन बीएचके २१.८९, टू बीएचके ३१.५८, थ्री बीएचके ३७.१२ तर गाळे ३०.६७ लाखांमध्ये उपलब्ध आहे. तसेच इंदिरानगरमध्ये ‘मॅजेस्टिक’ येथे गाळे १४.९१ तर ‘साकेत’ प्रकल्पात १२.१८ लाखापासून उपलब्ध आहे. तर द्वारका येथील ‘सेंट्रल पार्क’मध्ये २०.५० लाखात तर कर्मयोगी नगरजवळ ‘ऑप्टीमस’ प्रकल्पात वन बीएचके १८.९४ लाखात तर गाळे २२.४४ लाखात उपलब्ध आहे. यासोबतच हॉटेल जत्राजवळ ‘बेलिसिमो’ येथे टू बीएचके २९.१७ थ्री बीएचके ३९.८६ तर गाळे ३३.७० लाखामध्ये उपलब्ध आहे. शहर परिसरातील बहुतांश ठिकाणी ललित रुंगठा ग्रुपने ग्राहकांना हक्काचे घर उपलब्ध करुन दिले आहे. भविष्याचा वेध घेऊन नागरिकांच्या गरजा तसेच शाळा, उद्यान, सिनेमागृह, बाजारपेठ आदी जाणून ललित रुंगठा ग्रुपने गृह स्वप्नपूर्ती केली असल्याचे ललित रुंगठा यांनी सांगितले.

Web Title: New dream, new offer from Lalit Rungatha Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.