नाशकात काका-पुतण्याचा नवा अध्याय..

By Admin | Updated: May 13, 2014 00:13 IST2014-05-13T00:13:38+5:302014-05-13T00:13:38+5:30

. नाशिक : महाराष्टÑाच्या राजकारणात शरद पवार असो वा अजित, गोपीनाथ मुंडे वा धनंजय आणि अगदी नाशिकची वेगळ्या अर्थाने चर्चा करायची ठरली तर छगन भुजबळ असो वा समीर यांच्या नावाची चर्चा नेहमीच होत राहिली.

The new chapter of Kaka-nusha in Nashik .. | नाशकात काका-पुतण्याचा नवा अध्याय..

नाशकात काका-पुतण्याचा नवा अध्याय..

. नाशिक : महाराष्टÑाच्या राजकारणात शरद पवार असो वा अजित, गोपीनाथ मुंडे वा धनंजय आणि अगदी नाशिकची वेगळ्या अर्थाने चर्चा करायची ठरली तर छगन भुजबळ असो वा समीर यांच्या नावाची चर्चा नेहमीच होत राहिली. कधी काकाने पुतण्याला धोबीपछाड दिली, तर कधी पुतण्या वरचढ ठरल्याच्याही घटना घडल्या आहेत. नाशिकमध्ये नव्याने अशाच प्रकारे काका-पुतण्याच्या अध्यायाची पुनरावृत्ती होण्याची चर्चा सुरू झाली असून, त्यासाठी माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम यांनी काका दिनकर पाटील यांच्याविरुद्ध नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणुकीचे मैदान निवडले आहे. अर्थातच, या लढाईला स्पष्ट दुजोरा कोणी दिलेला नसला, तरी महापालिकेच्या पोटनिवडणुकीची शक्यता गृहीत धरून प्रेम पाटील यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी चालविलेली घाई संशयास्पद वाटू लागली आहे. दशरथ पाटील व दिनकर पाटील या दोघा भावांमधील फरक तसाही नाशिककरांनी यापूर्वी अनुभवला असला, तरी त्यांच्यात गेल्या काही वर्षांपासून झालेल्या बेबनावाची चर्चाही दबक्या आवाजात सातपूरच्या पंचक्रोशीत वेळीवेळी होत आली आहे. अगदी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी दोन्ही बंधू इच्छुक होते; परंतु दशरथ पाटील यांनी राजकीय परिपक्वता दाखवित दोन पावले मागे टाकली, तर दिनकर पाटील यांनी निवडणूक लढविण्याच्या इर्षेनेच प्रचारही केला व प्रसंगी पक्षांतर करून बसपाकडून उमेदवारीही केली. अर्थातच स्वत:चा प्रचार करताना दिनकर पाटील यांनीच वृत्तपत्रातील जाहिरातीतून घरातील ‘भाऊबंदकी’ रस्त्यावर आणल्याने या संबंधामध्ये आणखीनच ठिणगी पडली. दिनकर पाटील उमेदवार असताना दशरथ पाटील यांनी पालकमंत्री छगन भुजबळ व पर्यायाने आघाडीचा धर्म पाळणे पसंत केले व जाहीर प्रचारात सहभाग नोंदविल्याने पाटील कुटुंबीयांत सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. आता तर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये दिनकर पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणुकीचे नगारे वाजू लागले असून, पारंपरिक मतदारसंघातून दिनकर पाटील पुन्हा उमेदवारी करण्याची तयारी करीत आहेत. परंतु त्यांनी बसपाची उमेदवारी केली असल्याने साहजिकच त्यांना कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नाही. अशा वेळी आघाडीचा धर्म पाळणारे दशरथ पाटील यांच्या पुत्रासाठी पक्षाकडून उमेदवारीचा विचार होण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना पक्षाकडून तसे संकेत मिळाल्यानेच दशरथ पाटील यांनी पुत्राच्या जात प्रमाणपत्राची पडताळणीची तयारी केली आहे. सदरचा प्रभाग इतर मागासवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The new chapter of Kaka-nusha in Nashik ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.