नवी बेजला भरदिवसा चोरी
By Admin | Updated: September 16, 2014 00:34 IST2014-09-15T00:39:49+5:302014-09-16T00:34:46+5:30
नवी बेजला भरदिवसा चोरी

नवी बेजला भरदिवसा चोरी
पिळ्कोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य क्र मांक १७ लगत मळ्यात राहत असलेले शेतकरी सुनील कारभारी पवार यांच्या बेज -कळवण रस्त्या लगतच्या मळ्यातील राहत्या घरातून भर दिवसा सकाळी अकरा वाजता चोरि झाली असून ,चोरित दीड तोळे सोन्याचे दागिने व १५ हजार रूपये चोरीला गेले असल्याने दिवसा ढवळ्या झालेल्या या चोरीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे
नवी बेज येथील सुनील पवार हे कळवण येथे गेले होते . घरी फक्त त्याची लहान मुले होती. सकाळी ११ वाजता एक युवक मोटारसायकल वर त्याच्या घरी आला ,मी तुमच्या वडिलांचा मित्र आहे .ते घरी काही महत्वाचे कागदपत्र विसरले असल्याने ,त्यांनी माझ्याजवळ कपाटाच्या आतील ड्रावर ची चावी दिली असून ते घेण्यासाठी मला पाठवले आह,े असे सांगून घरात प्रवेश केला सुनील पवार यांच्या लहान मुलांना काही कळण्याच्या आत कपाटाच्या मधल्या ड्रावर तोडून दीड तोळे सोन्याचे दागिने, घेवून लागलीच पसार झाला.
त्यानंतर पवार यांच्या मुलांनी आरडा ओरडा करत सदर घडलेला प्रकार घरा शेजारून जाणाऱ्या मळ्यातील शेतकऱ्यांना सांगितला. शेतकऱ्यांनी पवार यांना फोनवरून सर्व हकीकत सांगितली तेव्हा पवार हे कळवण हून घराकडे परत येत होते. साडे अकरा वाजता घरी आल्यावर त्यांनी कळवण पोलिस स्टेशन ला जाऊन चोरी झाली असल्याची तक्र ार दाखल करावयास गेले. असता मला तेथील पोलिसांनी तुम्हाला नीट लक्ष देता येत नाही का अशी उलट चौकशी केली ,परंतु तक्रार मात्र नोंदवून घेतली नसल्याचे पवार यांनी सांगितले.
तक्रार नोंदवण्यापलीकडे पोलिसखात्याने काहीही केले नसल्यामुळे तालुकाभारात चोरीचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. आतापर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपासच लागला नसून ,पोलिस यंत्रणा निष्प्रभ ठरत असल्याचे बोलले जात आहे. ( वार्ताहर )