नेऊरगावकर सेवाव्रती कार्यकर्ते, शोकसभेत कार्याला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:42+5:302021-08-15T04:17:42+5:30
नाना नेऊरगावकर यांनी लौकिकाअर्थाने उपजीविकेसाठी पेठे विद्यालय आणि एचपीटी विद्यालयात काम केले असले तरी सुरुवातीचे सहा ते सात वर्षे ...

नेऊरगावकर सेवाव्रती कार्यकर्ते, शोकसभेत कार्याला उजाळा
नाना नेऊरगावकर यांनी लौकिकाअर्थाने उपजीविकेसाठी पेठे विद्यालय आणि एचपीटी विद्यालयात काम केले असले तरी सुरुवातीचे सहा ते सात वर्षे वगळता आजन्म स्वयंसेवक होते. संघकार्य हेच त्यांचे जीवन उद्दिष्ट होते. विविध क्षेत्रांतील लोकांना एकोप्याने जोडण्याचे काम त्यांनी केले, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर रा. स्व. संघाचे नाशिक जिल्हा संघचालक विजयराव कदम, नाशिक विभाग कार्यवाह प्रमोद कुळकर्णी आणि लोकनाथतीर्थ महाराज ट्रस्टचे प. पू. प्रकाशराव प्रभुणे हे उपस्थित होते.
यावेळी हेरंब गोविलकर, डॉ. शशीताई अहिरे, चंद्रशेखर वाड, भास्कर भानोसे, रमेश देशमूख, बापू येवला, भारत बापू जोशी, लक्ष्मण सावजी, नाना वाणी, निखिल प्रभुणे, अनिरुद्ध पंडित आदी मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले.