अर्थसंकल्पात निव्वळ घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:05+5:302021-02-05T05:40:05+5:30
- रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी ------------ देशाला विकणारा अर्थसंकल्प असून, मध्यमवर्गीयांना त्यात कोणताही दिलासा नाही. उलट भविष्य निर्वाह निधीच्या ...

अर्थसंकल्पात निव्वळ घोषणाबाजी
- रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
------------
देशाला विकणारा अर्थसंकल्प असून, मध्यमवर्गीयांना त्यात कोणताही दिलासा नाही. उलट भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर कराची आकारणी करण्यात आली आहे. पाकिस्तान, चीनचे संकट असताना संरक्षण क्षेत्रावर कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा कोठेही विचार केलेला नाही.
- शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस
----------
नाशिकमध्ये मेट्रोसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याबद्दल अभिनंदन. खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य होऊ शकले. आता प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर गती मिळावी व प्रकल्प नाशिककरांच्या उपयोगी ठरावा. महापालिकेत भाजप सत्तेची पाच वर्षे पूर्ण होत असताना त्यानंतर प्रकल्प निश्चित करण्यात आल्याचे दिसते.
- सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख, शिवसेना
-------
निओ मेट्रो प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून केंद्र सरकारने मान्यता दिली आहे, ही नाशिककरांसाठी आनंदाची बाब आहे. केंद्र सरकारने हा प्रकल्प देऊन खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासाला गती देण्याचे काम केले आहे. या प्रकल्पामुळे शहरांतर्गंत वाहतुकीचा प्रश्न सुटून विकासाचा वेग दुपटीने वाढण्यास मदत होणार आहे.
- गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप