नेपाळमध्ये नाशकातील पंधरा कुटुंबीय अडकले
By Admin | Updated: April 26, 2015 00:43 IST2015-04-26T00:43:18+5:302015-04-26T00:43:35+5:30
नेपाळमध्ये नाशकातील पंधरा कुटुंबीय अडकले

नेपाळमध्ये नाशकातील पंधरा कुटुंबीय अडकले
नाशिक : नेपाळसह देशातील काही ठिकाणी शनिवारी सकाळी भूकंपाचे तीव्र स्वरूपाचे धक्के बसले़ नेपाळच्या या भूकंपामध्ये नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेन्स कंपनीतील कर्मचाऱ्यांची पंधरा कुटुंबे अडकले आहेत़ दरम्यान, हे सर्व कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती नेपाळमध्ये गेलेल्या कुटुंबीयांपैकी एकाने कंपनी प्रशासनाला फोनद्वारे दिली आहे़ अंबड औद्योगिक वसाहतीतील सिमेन्स कंपनीतील १५ कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह २२ एप्रिलला विमानाने नेपाळला पर्यटनासाठी गेले़ हे सर्व कर्मचारी ३० एप्रिलपर्यंत नाशिकला परतणार होते़ त्यातच शनिवारी नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याने तेथील अतोनात नुकसान झाले.परंतु नाशिकमधून नेपाळला गेलेले नागरीक सुखरूप असल्याच्या माहितीनंतर कर्मचाऱ्यांच्या नाशिकमधील कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. अर्थात तसेच कुटुंबीयांपैकी एकाशीही संपर्क होत नसल्याने काळजीत अधिकच भर पडली होती़ दरम्यान, दुपारच्या सुमारास नेपाळ येथे गेलेल्या कुटुंबीयांपैकी कैलास सहाणे यांनी कंपनी प्रशासनाला फोन करून काठमांडू येथे सुखरूप असल्याची माहिती दिली असल्याचे सिमेन्सच्या व्यवस्थापनाने लोकमतला सांगितले. नाशिक जिल्'ातील चौधरी यात्रा कंपनीचेही नेपाळ - दार्जिलिंग या टूरसाठी एकूण ८३ नागरिक गेले आहेत़ त्यामध्ये १३ एप्रिलला २९ नागरिक गेले असून, ते गोरखपूर येथे सुरक्षित असून शनिवारी (दि़२५) रात्री दहा वाजेपर्यंत सोनाली बॉर्डरपर्यंत पोहोचणार आहेत, तर दुसरी ५४ नागरिकांची बस २२ एप्रिलला निघाली आहेत़ ही बस गंगासागर या ठिकाणी असल्याची माहिती चौधरी यात्रा कंपनीच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे़ सिमेन्स कंपनीतील कर्मचारी कुटुंबीय वा चौधरी यात्रा कंपनीचे यात्रेकरू सुरक्षित आहेत़ (प्रतिनिधी)