टाळकुटेश्वर मंदिराकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: September 21, 2015 23:43 IST2015-09-21T23:42:23+5:302015-09-21T23:43:11+5:30
टाळकुटेश्वर मंदिराकडे दुर्लक्ष

टाळकुटेश्वर मंदिराकडे दुर्लक्ष
नाशिक : शहरातील अतिप्राचीन अशा श्री टाळकुटेश्वर महादेव मंदिराची कुंभमेळ्याच्या कालावधीत कोणतीही डागडुजी व दुरुस्ती न करता त्याकडे महापालिका आणि अन्य शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केले असून, आता तरी या कामाकडे महापालिका आणि शासकीय यंत्रणांनी लक्ष द्यावे, अशी मागणी श्री टाळकुटेश्वर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात मंडळाने पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने महापालिकेने खर्च करून अनेक मंदिरे आणि देवस्थानांची रंगरंगोटी केली जाते. परंतु इ. स. १७८३ सालच्या अतिप्राचीन श्री टाळकुटेश्वर महादेव मंदिराची दुरुस्ती हाती घेण्यात आली; परंतु कळस आणि काही दुरुस्तीचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे.
दरवर्षी नदीच्या पुरात हे मंदिर येत असल्याने मंदिराच्या पाषाणाची झिज झाली आहे. मंदिराकडे लक्ष न दिल्यास मंदिर नष्ट होण्याची भीती मंडळाने व्यक्त केली असून, पुरातत्व विभाग, मनपा आणि शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी टाळकुटेश्वर भक्त मंडळ, अमरधाम बॉईज मंडळ, संकटमोचन हनुमान मंडळ, शितळादेवी मित्रमंडळ, कपालेश्वर भक्त मंडळाच्या वतीने तेजस शिंपी, नरेंद्र शिरसाट, निखिल अहिरे, प्रदीप वाघ, पंकज जाधव, अविनाश येवलेकर, हेमंत टोचे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)