शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

‘अभिनव भारत’च्या स्मारकाची राज्य सरकारकडूनही उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:51 AM

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे.

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे. मात्र, पर्यटन मंत्रालयाने निधीच न दिल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून, आता तरी याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा सावरकरप्रेमी स्वत:च या कामी पुढाकार घेण्याच्या तयारीत आहेत.नाशिकचे भूमिपुत्र असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्ययन करत असतानाच मित्र मेळा ही संस्था स्थापन केली, पुढे तिचे नाव बदलून अभिनव भारत या संघटनेची स्थापना १९०४ मध्ये केली. नाशिकमधील तीळभांडेश्वरमध्ये त्याचे कार्यालय होते. ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे अनेक क्रांतिकारी या संघटनेशी जोडलेले होते. देशभरात या संघटनेच्या अनेक शाखा त्याकाळी उघडल्या गेल्या आणि सावरकर लंडनमध्ये गेल्यानंतर तेथेदेखील अभिनव भारतचा प्रसार झाला. १९५२ मध्ये म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकर यांनी स्वत:च या संघटनेचे कार्य आता संपल्याचे सांगून ती संघटना विसर्जित केली. नाशिकमध्ये असलेल्या संघटनेच्या कार्यालयाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्याच्या नूतनीकरणाची गरज असतानाच पर्यटन खात्याच्या माध्यमातून अद्ययावत स्मारक करण्याचे ठरविण्यात आले. आमदार देवयानी फरांदे यांनी याकामी पुढाकार घेतला. परंतु आता सरकारची पाच वर्षे संपत आली तरी स्मारकासाठी निधीच उपलब्ध करून दिलेला नाही. विशेष म्हणजे अन्य अनेक धार्मिक संस्था, क्रीडा संस्थांना पर्यटन महामंडळाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर त्याचे कामही सुरू झाले आहे. सावरकर यांना मानणाऱ्या विचारांचे सरकार असूनही जर त्याचा विकास होत नसेल तर तसे स्पष्ट झाले पाहिजे, म्हणजे आता सावरकरप्रेमीच हे काम हाती घेतील, अशा प्रतिक्रिया सावरकरप्रेमींनी व्यक्त केल्या.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिक