नायगाव - येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालयातील दहावीच्या १९७७ सालातील विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा भरवित जुन्या आठवणींना उजाळा दिला.येथील ख-याबाबाच्या वाड्यात अ,ब,ड पासून शिक्षणाचा श्रीगणेशा करणारे नायगाव खो-यातील विविध गावातील विद्यार्थी तब्बल ४२ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. साठीच्या उंबरठ्यावर असलेले सर्व माजी विद्यार्थी जोगलटेंभी येथिल संगमावर एकत्र आले.यावेळी तात्कालिन शिक्षक नवले,चव्हाण , यादव, सांवत आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.तसेच त्यावेळी शाळेतील शिपाईमामा त्रंबक हांडगे यांना विद्यार्थ्यांच्यावतीने महावस्त्र देवून कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देत सध्याची परिस्थती कथन केली.यावेळी शाळेतील जुन्या आठवणी सांगत अनेक गोष्टींचा उलगडा केला.शाळेतील अनेक गमतीदार किस्से सांगत हास्याचे फवारे उडवले.यावेळी अशोक लोहकरे,वनअधिकारी मनोहर बोडके,सुदाम बोडके,गोविंद दिघोळे,टी.डी.भगत,दिगंबर कातकाडे ,गंगुबाई तांबे,राजु कलंत्री,पांडुरंग बोडके,लता कुयटे,मारूती भास्कर ,रघुनाथ हांडगे,उत्तम कातकाडे,शांताराम लहाने,नंदा राजगुरू,दत्ता कातकाडे,श्रीकृष्ण पाबळे आदीसह माजी विद्यार्थी हजर होते.बाळकृष्ण तांबे यांनी सुत्रसंचालन तर शांताराम पवार यांनी आभार मानले.
नायगावी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 13:11 IST