माहिती तंत्रज्ञान महाजालात सुरक्षित यंत्रणांची गरज
By Admin | Updated: May 2, 2017 18:00 IST2017-05-02T18:00:19+5:302017-05-02T18:00:19+5:30
डिजीधन मेळावा : व्यापारीवर्गाला डिजिटल पेमेंटविषयी मार्गदर्शन

माहिती तंत्रज्ञान महाजालात सुरक्षित यंत्रणांची गरज
नाशिक : केंद्र सरकारने जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर भारताने कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या मार्गाने विकसित राष्ट्रांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान महाजालात सुरक्षित यंत्रणांचा वापर करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचा सूर मंगळवारी (दि. २) मु. शं. औरंगाबादकर सभागृहातील डिजीधन मेळाव्यात उमटला.
मेळाव्यात सहभागी वक्त्यांंनी भीम अॅप, यूपीआय, पीओएस, व्यवहारांच्या सुरक्षेविषयी माहिती दिली. भीम अॅपप्रमाणेच दिसणारे सुमारे आठ फसवे अॅप सध्या आहेत. त्यापैकी अधिकृत अॅप्लिकेशन निवडण्याची पद्धत यावेळी समजावून सांगण्यात आली. किरकोळ, घाऊक धान्य व्यापारी संघटना व नाशिक कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएसन आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान संस्थेच्या औरंगाबाद संस्थेतर्फे नाशिक शहरातील व्यापाऱ्यांसाठी डिजिटल कॅसलेस इंडिया आणि कॅसलेस पेमेंट विषयावर मेळावा आयोेजित करण्यात आला होता.