शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

कोरोनासारख्या महामारी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता : भगतसिंह कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 16:39 IST

कोरोना महामारीच्या काळात आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित झालेे असून, या काळात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगा यांसारख्या विविध पॅथींनीही एकत्रित केलेले काम कौतुकास्पद असले तरी कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात तंत्रशुद्ध संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना मिळण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

ठळक मुद्देकोरोना महामारीच्या काळात आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखितराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादनविद्यापीठाच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन

नाशिक : कोरोना महामारीच्या काळात आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित झालेे असून, या काळात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगा यांसारख्या विविध पॅथींनीही एकत्रित केलेले काम कौतुकास्पद असले तरी कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात तंत्रशुद्ध संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना मिळण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकृत मुख्य प्रशासकीय इमारतीचे तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिककार्य मंत्री तथा कुलपती अमित देशमुख, डीएमईआरचे संचालक तात्याराव लहाने, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्र-कुलगुरू मोहन खामगावकर, कुलसचिव कालिदास चव्हाण उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, डॉक्टर आणि नर्सचे आरोग्यसेवेचे व्रत अवघड आहे. त्यापेक्षा शिक्षण घेणे अवघड असून, अशी ज्ञान ग्रहणाची शक्ती लाभलेल्यांसाठी पायाभूत सुविधांची पूर्तता होणे गरजेचे आहे. शिक्षण तर महत्त्वपूर्ण आहेच. पण वैद्यकीय शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व असून, त्यासाठी नेतृत्वाची भूमिका पार पाडताना योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  दरम्यान, कोरोनाला न घाबरता सामना करा, मात्र निष्काळजीपणा करू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, आरोग्य विद्यापीठाच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कौतुक करताना ते म्हणाले, बदलत्या परिस्थितीत स्वच्छ ऊर्जेचा स्त्रोत असलेल्या सौरऊर्जेला प्रोत्साहन देणे आवश्यक असून त्यादृष्टीने आरोग्य विद्यापीठाने टाकलेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिकmedicineऔषधंbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीAmit Deshmukhअमित देशमुखChagan Bhujbalछगन भुजबळ