शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे -बाळासाहेब थोरात

By admin | Updated: February 9, 2015 02:09 IST

चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे -बाळासाहेब थोरात

नाशिक : पूर्वीच्या आणि आताच्या निवडणुकांत बराच फरक पडला आहे. निवडणुकीची आताची पद्धत पाहिल्यावर लोकशाहीचे पुढे कसे होईल, उमेदवारी करावी की नाही, असा प्रश्न पडतो. निवडणुकांतील वाढता खर्च हा काळजीचा विषय झाला असून, याबाबत चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री तथा संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार स्वीकारल्यानंतर थोरात बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ होते. थोरात यांच्या पत्नी कांचन, पुरस्कार निवड समितीचे जयप्रकाश छाजेड, वंदन पोतनीस, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष वासुदेव दशपुत्रे, कार्याध्यक्ष प्रा. विनया केळकर, देणगीदार डॉ. शोभा नेर्लीकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमात बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते बाळासाहेब थोरात यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पन्नास हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.सत्काराला उत्तर देताना थोरात म्हणाले की, हा पुरस्कार हा आपल्या लोकप्रतिनिधित्वाचा सन्मान आहे. कौतुकामुळे उमेद वाढते. संगमनेरच्या जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी वयाच्या तिशीतच मिळाली. वडील भाऊसाहेब यांनी पाया तयार करून ठेवला होता. लोकप्रतिनिधीसाठी त्याचा मतदारसंघ सर्वांत महत्त्वाचा असतो. नियोजन, प्रामाणिकपणा व सातत्य यामुळेच यश मिळू शकले. काम केले नाही असा एकही दिवस गेला नाही. पाटबंधारे, शिक्षण, कृषी, महसूल अशा सर्व खात्यांत काम करण्याच्या संधीचे चीज केले. विरोधक, पक्षांतर्गत विरोधक, लोकांच्या अपेक्षा, कामांचे दडपण, प्रतिमेची जपणूक अशा अनेक आघाड्यांवर आमदाराला लढावे लागते. महाराष्ट्रात अनेक आमदार चांगले काम करीत आहेत. त्यांना सन्मानित केल्यास त्यांची उमेद वाढेल. नाशिक जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत एकत्र येऊन, चर्चा करून मार्ग काढावा लागेल, असे ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांची केली स्तुतीआमदार बाळासाहेब थोरात यांनी गतवर्षीचे कार्यक्षम आमदार पुरस्कारविजेते तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. फडणवीस यांना विधानसभेतील कामकाजाचा फायदा झाल्याचे सांगत त्यांना लोकांच्या प्रश्नांची चांगली जाण असून, ते प्रश्नांची चांगली मांडणी करीत असल्याचेही ते म्हणाले. जयप्रकाश छाजेड, वंदन पोतनीस यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. औरंगाबादकर यांनी प्रास्ताविक केले. सावानाचे नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, प्रा. विनया केळकर यांनी परिचय करून दिला. दिनेश गायधनी, देवांग जोशी, विजय पाठक यांनी पुरस्कार वितरणापूर्वी वेदमंत्राचा उद्घोष केला. नरेश महाजन यांनी सूत्रसंचालन केले. जयप्रकाश जातेगावकर यांनी आभार मानले. आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, विनायकदादा पाटील, माधवराव पाटील, रावसाहेब कसबे, गुरुमित बग्गा, राजाराम पानगव्हाणे, शरद अहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)