मनाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज : वासंतीदीदी
By Admin | Updated: October 24, 2014 01:03 IST2014-10-24T00:52:23+5:302014-10-24T01:03:31+5:30
मनाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज : वासंतीदीदी

मनाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज : वासंतीदीदी
नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब सानप यांनी नुकतीच प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय
विश्व विद्यालयाला भेट दिली. ही संस्था नि:स्वार्थ भावनेने काम करीत आहे, असे गौरवोद्गार सानप यांनी काढले.
संस्थेच्या वतीने संचालक वासंतीदीदी यांनी स्वागत केले तसेच सानप यांचा सत्कार केला. सध्याच्या काळात पर्यावरणाबरोबरच मानसिक प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे सांगून वासंतीदीदी यांनी मनाच्या स्वच्छतेकडेही गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी वसंत व्याख्यानमालेचे श्रीकांत बेणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणादीदी आणि पूनमदीदी यांनी केले. (प्रतिनिधी)