नेता होण्यासाठी विविध गुणांची गरज : बुलगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:39 IST2018-06-04T00:39:17+5:302018-06-04T00:39:17+5:30

नाशिक : नेता होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, वक्तशीरपणा, कर्तव्याप्रती जागरूकता, संधीचा सदुपयोग करण्याची क्षमता तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या समजावून घेत त्यांना दिशा देणाऱ्या गुणांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पुणे येथील यशदा संस्थेचे प्रशिक्षक विठ्ठल बुलगुले यांनी केले़

 Need Different Qualities Needed To Be a Leader: Bulgule | नेता होण्यासाठी विविध गुणांची गरज : बुलगुले

नेता होण्यासाठी विविध गुणांची गरज : बुलगुले

ठळक मुद्देछात्रभारती संघटना विविध विषयांवर गटचर्चा

नाशिक : नेता होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, वक्तशीरपणा, कर्तव्याप्रती जागरूकता, संधीचा सदुपयोग करण्याची क्षमता तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या समजावून घेत त्यांना दिशा देणाऱ्या गुणांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पुणे येथील यशदा संस्थेचे प्रशिक्षक विठ्ठल बुलगुले यांनी केले़
गंगापूररोड परिसरातील नवरचना ट्रस्टच्या इमारतीत सुरू असलेल्या छात्रभारतीच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ‘नेता घडविताना’ या विषयावर मार्गदर्शन करताना विठ्ठल बुलगुले बोलत होते़ शिबिराच्या तिसºया दिवसाच्या द्वितीय सत्रात सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांनी ‘जातीअंताची साखळी’ या विषयावर मार्गदर्शन केले़ त्यानंतर छात्रभारतीच्या कामाच्या पुढील दिशा या विषयावर चर्चा करण्यात आली़
शिबिराच्या दुपारच्या सत्रात सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांनी जातीअंताची साखळी या विषयावर मार्गदर्शन करताना जाती कशा निर्माण झाल्या, त्यामुळे समाजातील वाढलेली दरी मिटविण्यासाठी कराव्या लागणाºया उपाययोजना, यासाठी आरक्षणाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले़ समाजातील काही वरिष्ठ जातींनाही आरक्षणाची आवश्यकता असली तरी कायद्याने ती देता येत नाही त्यामुळे सरकारनेच यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे़ जाती-जातीतील भेदभावामुळे महिला मागे पडल्याचे पगारे यांनी सांगितले़
यावेळी राज्य उपाध्यक्ष राकेश पवार, सागर भालेराव, राज्यसदस्य दीपक देवरे, सागर निकम, शहराध्यक्ष समाधान बागुल, अरुण दोंदे, शरद कोकाटे आदींसह छात्रभारतीचे राज्यभरातील सदस्य उपस्थित होते़ दरम्यान, या प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोमवारी पुणे येथील सुभाष वारे यांच्या उपस्थितीत होणार आहे़
छात्रभारतीच्या कामाची पुढील दिशा या विषयावरील चर्चेत आरोग्य व शिक्षण यामधील खासगीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली़ त्यात सरकारने बंद केलेल्या शाळांना भेटी देणे, त्यांची गुणवत्ता कमी होण्याची कारणमीमांसा शोधून त्याचा अहवाल तयार करून तो सचिव व सरकारला सादर करण्याबाबतची चर्चा यावेळी करण्यात आली़

Web Title:  Need Different Qualities Needed To Be a Leader: Bulgule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.