शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी सामुदायिक नेतृत्वाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 01:03 IST

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभरात २७ संघटना आहेत; मात्र सर्व वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत असल्याने आरक्षणाबाबत सरकारवर दबाव पडत नाही. त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व करण्याची गरज असल्याचे मत भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी (दि. २६) व्यक्त केले. 

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे-पाटील : वेगवेगळ्या संघटनांमुळे संभ्रम 

नाशिक : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभरात २७ संघटना आहेत; मात्र सर्व वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत असल्याने आरक्षणाबाबत सरकारवर दबाव पडत नाही. त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व करण्याची गरज असल्याचे मत भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी (दि. २६) व्यक्त केले. नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना विखे-पाटील यांनी हे मत व्यक्त करतानाच मराठा आरक्षणाबाबत नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचेही सांगितले. तसेच आरक्षणप्रकरणी प्रामुख्याने राज्य सरकारची जबाबदारी असून, त्यांनी ती पार पाडली पाहिजे, असेही मत व्यक्त केले. मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही याबाबत शल्य असल्याचे सांगताना आता त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. आरक्षण या विषयावर लहान मोठ्या एकूण २७ संघटना आहेत. आरक्षणाबराेबरच अन्य मुद्देही ते हाताळतात. त्यामुळे आरक्षणाचा मूळ मुद्दा केंद्रस्थानी येत नाही. अशा विस्कळीतपणामुळेच अनेक नेते आणि मंत्र्यांचे आरक्षणाबाबत उलटसुलट भाष्य करण्याचे धैर्य येते. त्यामुळे आरक्षण या एकाच मुद्यावरच सर्व लक्ष केंद्रित झाले पाहिजे त्यासाठीच सर्व संघटनांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, तसेच सामूहिक नेतृत्व ठरविले पाहिजे, तसे झाले तर सरकार कोणाचेही असो त्यावर दबाव पडू शकेल असेही विखे-पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. मात्र, त्यांनीही सामूहिक नेतृत्वात आले पाहिजे. संघटनांची इच्छा असेल तर त्यांनी नेतृत्वही दिले पाहिजे असे सांगून विखे-पाटील यांनी संभाजीराजे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट नाकारल्याबद्दल आपल्याला माहिती नाही. त्यावर संभाजीराजे आणि आपले बोलणे झालेले नाही, असे ते म्हणाले. 

काँग्रेसचे मंत्री दु:खी आहेत....जुन्या पक्षातील अनेक नेते आणि मंत्र्यांशी बोलणे होते. बिचारे दु:खी आहेत. आम्हाला कोणी विचारत नाहीत असे ते जाहीररीत्या सांगतात, असे सांगून विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, अशी कोपरखळीही मारली.

टॅग्स :NashikनाशिकMaratha Reservationमराठा आरक्षणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील