शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनाच्या लढाईत तरुणाईच्या विवेक जागृतीची गरज, श्रीकृष्ण कोकाटे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 20:17 IST

तरुण पिढीने कोणतीही कृती करताना आपला विवेक जागृत ठेवणे आवश्यक असून सामाजिक परिवर्तनाची लढाई जिंकण्यासाठी तरुणाईचा विवेक जागा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.

ठळक मुद्देकिरकोळ गुन्ह्याचे परिणाम मोठेगुन्हेगारी दूर कऱण्यासाठी विवेक जागृतीची गरजविवेक विचार सप्ताहात श्रीकृष्ण कोकाटे यांचे प्रतिपादन

नाशिक : गुन्हा कुठलाही असो त्याची सुरुवात किरकोळ कारणामुळे होत असते, परंतु त्याचे परिणाम मात्र अतिशय मोठे असतात, त्यामुळे तरुण पिढीने कोणतीही कृती करताना आपला विवेक जागृत ठेवणे आवश्यक असून सामाजिक परिवर्तनाची लढाई जिंकण्यासाठी तरुणाईचा विवेक जागा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.विवेकवाहिनी व विवेक युवा विचार सप्ताह समितीतर्फे विवेक युवा विचार सप्ताहाअंतगर्त क्रांतीवीर वसतराव नारायण नाईक महाविद्यालयात व्याख्यानेमालेचे दुसरे पुष्प गुंफताना नाशिकचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व स्वीकारावे. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला शॉर्ट कट हवा असतो, यामुळे अनेकदा असा शॉर्ट कट निवडल्याने आपले नुकसान होते. त्यामुळे परीश्रम करून यश मिळविण्यासाछी प्रयत्न करतानाच विद्यार्थ्यांनी सायबर स्पेसचा वापर योग्य करणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार अनुसरले तर ते जीवनात परिवर्तन घडवून आणणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. युवापिढीसाठी इंटरनल सिक्युरिटी हा अतिशय महत्वाचा विषय सून तरुणानी याविषयावरही अभ्यास करणे गरजेचे आहे. भारताच्या 76 मुख्य जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद वाढलेला आहे. शासन ही शोषण करणारी यंत्रणा आहे असे वातावरण तयार करून तरुणांच्या मनात ते बिंबवले जाते. त्यामुळे आपण यावर गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये मोटारसायकल चोरी आणि मालमत्तांसदर्भात गुन्हे ही अतिशय मोठी समस्या आहे. या विकृत मनोवृत्तीला समाजातून हद्दपार करण्यासाठीच तरुणाईचा विवेक जागृत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उद्दिष्टासाठी स्वतःला झोकून द्यायला हवे. सध्याच्या काळात 90% तरुणाईचा वेळ हा मोबाईलच्या चुकीच्या वापरात वाया जात आहे, तो त्यांनी नवनवीन संशोधनात्मक गोष्टींचा अभ्यास करण्यसाठी सत्कारणी लावावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी के.व्ही.एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, प्राचार्य बडगुजर आदि उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश नखाते यांनी केले. सूत्रसंचालन किरण सोनवणे यांनी केले. शरद काकड यांनी आभार मानले, दरम्यान, क्रांतीवीर वसतराव नारायण नाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तीपत्रकाचेही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि आजचा तरुण या विषयावर भाष्य करणाऱ्या भित्तीपत्रकाचा यावेळी अनावरण करण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिकcollegeमहाविद्यालय