राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसचा हल्लाबोल
By Admin | Updated: July 23, 2016 01:07 IST2016-07-23T00:56:18+5:302016-07-23T01:07:11+5:30
राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसचा हल्लाबोल
नाशिक : कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्त्या करणाऱ्या नराधमांना फाशी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करून मागणीचे निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो युवती सहभागी झाल्या होत्या. फाशी द्या, फाशी द्या, बलात्काऱ्यांना फाशी द्या, अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, कोपर्डी घटनेसारख्या अनेक घटना राज्यात घडत असून, त्यात जळगावमध्ये दहा वर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला, तर नाशिकमध्येही निव्वळ अंगावर कोड असल्यामुळे विवाहितेला जिवंत जाळण्यात आले आहे. पळसे येथे शिक्षिकेने छेडछाडीला कंटाळून आत्महत्त्या केली. या सर्व घटना पाहता, गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटेनाशी झाल्यामुळे त्यात वाढ होत असून, सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे.