प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची कसोटी

By Admin | Updated: January 31, 2017 00:31 IST2017-01-31T00:31:22+5:302017-01-31T00:31:38+5:30

पंचवटी विभाग : निवडणुकीसाठी पॅनल पूर्ण होईना

NCP's Test in Ward 3 | प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची कसोटी

प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची कसोटी

  संदीप झिरवाळ : पंचवटी

आगामी महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी अद्यापपर्यंत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पॅनल पूर्ण न झाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसला भाजपाशी टक्कर देताना मोठी कसरत करावी लागणार आहे. सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून दोन विद्यमान नगरसेवक रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू असून पॅनलमध्ये अन्य दोन सक्षम उमेदवारांचा पक्षाला शोध घ्यावा लागणार आहे. सध्या दोघे विद्यमान नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असले तरी कधी हा, कधी ना अशीच काहीशी चर्चा या दोहो उमेदवारांपैकी एका उमेदवाराची असल्याने तसेच अन्य एक उमेदवार अन्य पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमित आहे. सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या इच्छुकांनी स्वत:च ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपा, मनसे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागातून निवडूून आलेले होते, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या एका विद्यमान नगरसेवकाने भाजपात तर भाजपाच्या एका महिला नगरसेवकाने मनसेत प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये खरी लढत सेना-भाजपात होण्याची शक्यता असली तरी मनसे व राष्ट्रवादी कॉँग्रेसने उमेदवार उभे करून सेना-भाजपाला शह देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आमदार बाळासाहेब सानप यांचा हा प्रभाग असल्याने सानप यांनी या प्रभागाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीकडे दोन विद्यमान नगरसेवक असले तरी अद्याप दोन सक्षम उमेदवारच नसल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पॅनल सध्या तरी अपूर्ण आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये १ जागा इतर मागास प्रवर्ग, एक सर्वसाधारण पुरुष, तर दोन जागा महिला सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

Web Title: NCP's Test in Ward 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.