शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

त्र्यंबकला नळांना मीटर बसविण्यास शहर राष्ट्रवादीचा तिव्र विरोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:43 IST

त्र्यंबकेश्वर : येथील पालिका हद्दीतील खाजगी नळांना पाण्याचे मीटर बसविण्याचा घाट पालिकेने घातला असुन सर्वसाधारण सभेत सभासदाचा विरोध असतांना सभेची ...

ठळक मुद्देआजही शहरात 45 मिनिटांपेक्षा जास्त पाणी सोडले जात नाही.

त्र्यंबकेश्वर : येथील पालिका हद्दीतील खाजगी नळांना पाण्याचे मीटर बसविण्याचा घाट पालिकेने घातला असुन सर्वसाधारण सभेत सभासदाचा विरोध असतांना सभेची मंजुरी न घेताच निविदा देखील वर्तमान पत्रात प्रसिध्द केली आहे. या पाशर््वभूमीवर येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदन देउन तिव्र विरोध केला आहे. विशेष म्हणजे उदभव जलाशयांना पाणी कमी असतांनाही पालिकेने 24 तास पाणी पुरवण्याचा दावा केला आहे.यापुर्वी पालिकेने मीटर बसविलेही होते. पण तो प्रयोग अयशस्वी ठरला होता. तरीही पालिका प्रशासनाने परत मीटर बसविण्याचा घाट घालुन शहरातील हजारो कुटुंबांना लाखो रु पयांचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने संपुर्ण गावातुन मोठ्या प्रमाणात पालिकेला असंतोषाला सामोरे जावे लागणार आहे.आज पालिकेला दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे म्हटले आहे की, त्र्यंबक न.प. ही क वर्ग नगरपरिषद आहे. येथील 60 त्न लोक मोलमजुरी करु न राहणारे आहेत. हातावर पोट भरु न उदर निर्वाह करणारे आहेत. काही वर्षांपुर्वी बसविलेल्या मीटर्सचा अनुभव पालिकेला चांगला आला नाही. उलट हवे तेवढे पाणी न दिल्याने मीटरप्रमाणे कुणीही भाडे भरु शकले नाही. उलट त्यावेळेस पालिक तोट्यात आली.आजही शहरात 45 मिनिटांपेक्षा जास्त पाणी सोडले जात नाही. याशिवाय यावर्षी अवघा 1610 मि.मि.पाउस पडल्याने धरणातील पाण्याचा साठा कमीआहे. उन्हाळ्यात शहराला एक दिवसाआड तर कधी दोन दिवसाआड पाणी सोडावे लागते. अशा परिस्थितीत मीटर पध्दतीने गावात 24 तास पाणी पुरवठा करु , असे सांगून गावात मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाउस झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात तापमानात वाढ होणार असुन अती उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होउन जलाशय आटल्याने कमी होणार आहेत. अशा अवस्थेत 24 तास पाणी पुरवठा कसा होउ शकेल ? असा प्रश्न निर्माण होउ शकतो. अशी सर्वच विरोधाची परिस्थिती असतांना नागरिकांना पुरेसे पाणी पुरविता येणे शक्य होणार नाही. परिणामी शासनाचे पर्यायाने जनतेचे लाखो रु पये खर्च करु न नळांना मीटर बसविण्याचा आग्रह केला जाउ नये. तरी मीटर बसउ नये. नगरसेवकांचा देखील विरोध असल्याचे समजते. मीटर बसविण्याची सक्ती केल्यास गावातुन संतापाचा उद्रेक होउन जनआंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. असा इशारा शेवटी देण्यात आला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष लक्ष्मीकांत म.काण्णव वसंत भोसले संतोष कडलग बंडोपंत मिसिर प्रविण गंगापुत्र मोहन कालेकर पुरु षोत्तम कडलग विजय व.गांगुर्डे कौस्तुभ कुलकर्णी परशुराम पाडेकर संदीप कुलकर्णी ज्ञानेश्वर गुंड राजेंद्र भोसले अरु ण वाघ राजु झोले विजय म. गांगुर्डे अनिल काळे स्विप्नल बागडे विजय मुर्तडक उमेश दाते अनिल कासट राकेश झोले अमोल परदेशी सागर चौधरी योगेश खोडे जितेंद्र झोले आदींच्या स्वाक्षरी आहेत.