वृक्षलागवडीच्या निविदेस राष्ट्रवादीचा आक्षेप
By Admin | Updated: July 12, 2014 00:24 IST2014-07-11T23:46:38+5:302014-07-12T00:24:50+5:30
वृक्षलागवडीच्या निविदेस राष्ट्रवादीचा आक्षेप

वृक्षलागवडीच्या निविदेस राष्ट्रवादीचा आक्षेप
नाशिक : पालिकेने अलीकडेच काढलेल्या सव्वादोन कोटी रुपयांच्या वृक्षलागवडीच्या निविदेस राष्ट्रवादी कॉँग्रेसने आक्षेप घेतला असून, पालिकेने ती त्वरित थांबवावी आणि सेवाभावी संस्थांमार्फत वृक्षलागवड करावी, अशी मागणी पक्षाच्या गटनेत्या प्रा. कविता कर्डक यांनी केली आहे.
महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षीही १७ लाख ७७ हजार रुपये खर्च करून प्रत्येक विभागात दोन हजार याप्रमाणे झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. परंतु प्रत्यक्षात ही झाडे कुठे लावली याचाच पत्ता नाही. या झाडांचा शोध घेऊनही ती आढळत नसताना आता पुन्हा सव्वादोन कोटी रुपये खर्च करून वृक्षलागवड करण्याचे घाटत आहे. यासंदर्भात निविदा मागविण्यात आल्या असल्या, तरी निमासारख्या औद्योगिक संस्था आणि काही पर्यावरणप्रेमी संस्था वृक्षलागवडीसाठी उत्सुक असून, त्यांना आवाहन केल्यास पालिकेची आर्थिक बचत होईल तसेच वृक्षलागवडीचे कामही होऊ शकेल असे प्रा. कर्डक यांचे म्हणणे असून, त्यांनी यासंदर्भात उद्यान अधीक्षकांना पत्र दिले आहे. (प्रतिनिधी)