शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

उत्कंठावर्धक लढतीत राष्टवादीच्या माणिकराव कोकाटे यांची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:07 IST

अतिशय अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा २०७२ मतांनी पराभव करून विधानसभेत ‘कमबॅक’ केले.

सिन्नर : अतिशय अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा २०७२ मतांनी पराभव करून विधानसभेत ‘कमबॅक’ केले. एकदा पराभूत झाल्यानंतर पुन्हा विजयी न होण्याची सिन्नरच्या राजकीय इतिहासातील परंपरा कोकाटे यांनी खंडित केली. अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत शेवटच्या फेरीत विजयाचा निकाल जाहीर झाला.सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. टपाली मतदानासह एकूण २४ फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीत राष्टÑवादीच्या कोकाटे यांनी १३७६ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसºया फेरीत कोकोटेंची १०८० मतांची आघाडी राहिली. ही आघाडी वाढत गेली. तिसºया फेरीअखेरीस कोकाटे ५१३० मतांनी आघाडीवर राहिले. चौथ्या फेरीत कोकाटेंची आघाडी २२७८ पर्यंत राहिली. पाचव्या फेरीत आघाडी वाढून ३८८२ झाली. सहाव्या फेरीत कोकाटेंनी पुन्हा मुसंडी मारून आघाडी ५४९० वर नेली. सातव्या आणि आठव्या फेरीत अखेरी ५३२४ मतांनी कोकाटे पुढे होते. नवव्या फेरीत आघाडी कायम ठेवून दहाव्या फेरीअखेर कोकाटेंची आघाडी ३४०९ वर आली. अकराव्या फेरीत कोकाटेंच्या आघाडीत वाढ होऊन ४०७२ मताधिक्य झाले. बाराव्या व तेराव्या, चौदाव्या, पंधराव्या, सोळाव्या फेरीअखेरी कोकाटे पाच हजाराच्या पुढे आघाडीवर होते. सतराव्या फेरीत कोकाटेंचे मताधिक्य कमी झाले मात्र कोकाटेंची आघाडी ४५० मतांची राहिली. १८व्या फेरीत ४९६ मतांनी आघाडी ठेवली. १९व्या फेरीत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांनी कोकाटेंवर ५०५ मतांनी आघाडी घेत चुुरस निर्माण केली. कोकाटेंपेक्षा वाजे पाचशे मतांनी पुढे गेल्याने अटीतटीच्या सामना सुरू झाला. २० व्या फेरीत वाजे यांनी ३१२ मतांनी आघाडी कायम ठेवली. २१व्या फेरीत कोकाटे यांनी पुन्हा ६०० मतांनी वाजे यांच्यावर मताधिक्य घेतले. २२व्या फेरीत कोकाटे यांनी ५२० मतांनी आघाडी कायम ठेवली.२३व्या फेरीत टपाली मतदान मोजण्यात आले. त्यात वाजे यांनी कोकाटे यांच्यावर टपाली मतदानात २५५ मतांनी आघाडी घेतली. त्यामुळे कोकाटेंची मताधिक्य केवळ २६५ राहिले होते. शेवटच्या फेरीत टाकेद गटात माणिकराव कोकाटे यांनी जोरदार मुसंडी मारत राजाभाऊ वाजे यांच्यावर २०७२ मतांनी विजय मिळविला.विजयाची तीन कारणे...1शेवटच्या क्षणाला राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने टर्निंग पॉइंट मिळवला. शरद पवारांची सहानुभूती व छगन भुजबळांमुळे बळकटी मिळाली.2लोकसभा निवडणुकीत सिन्नर विधानसभेची रंगीत तालीम करून जनतेची मते आजमावून घेतली. या निवडणुकीत तालुक्यात मताधिक्य घेऊन कार्यकर्त्यांचा मोट बांधून उत्साह वाढवला.3टाकेद गटासह पश्चिम भागात संपर्क वाढवला. सिन्नर शहराच्या पाणीप्रश्नावर आवाज उठवला.वाजेंच्या पराभवाचे कारण...सिन्नर शहराची पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आलेले अपयश आणि कार्यकर्त्यांचा फाजील आत्मविश्वास नडला. पूर्णत: कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्यांनी सत्ताधाºयांवर नाराजी दाखविली. पूर्व भागात लक्ष केंद्रित करण्याच्या नादात पश्चिम पट्ट्यावर असलेली पकड घसरली. छगन भुजबळांची कोकाटेंना साथ.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते1 राजाभाऊ वाजे शिवसेना 94,9392 राजू मोरे बसपा 7613 मनोहर दोडके म.क्रां.सेना 2854 विक्रम कातकाडे वंचित ब. आ. 28865 शरद शिंदे प्रहर जनशक्ती 3216 किरण सारुक्ते अपक्ष 2587 विलास खैरनार अपक्ष 2388 रामचंद्र जगताप अपक्ष 527

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sinnar-acसिन्नरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक