राष्ट्रवादीच्या कोविड सेंटरमुळे रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:00+5:302021-05-10T04:14:00+5:30
१५ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्रीडा संकुलात कोविड सेंटर सुरू केले. कोविड सेंटरमध्ये तीनशे बेडची व्यवस्था करण्यात आली ...

राष्ट्रवादीच्या कोविड सेंटरमुळे रुग्णांना जीवदान
१५ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्रीडा संकुलात कोविड सेंटर सुरू केले. कोविड सेंटरमध्ये तीनशे बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी २०० बेड ऑक्सिजनचे, तर १०० बेड विनाऑक्सिजन तयार करण्यात आले आहे. कोरोनाबाधित ज्या रुग्णांचा एचआरसिटी स्कोर १ ते १२ व ऑक्सिजन पातळी ९० पर्यंत असते त्यांना या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. रुग्णांची देखभाल करण्यासाठी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, असे २७ जणांचे वैद्यकीय पथक कार्यरत आहे. पथकातील कर्मचारी सकाळ, दुपार व रात्री अशा तीन शिफ्टमध्ये काम करतात. उपचार घेत असलेल्या रुग्णांना सकाळी नाश्ता, फळांचा रस, दोन अंडी, चहा, दुपारी वरण-भात, भाजी, सलाड, तर रात्री भाजी-पोळी, हळदीचे दूध दिले जाते. रुग्णांना गरज पडल्यास नेमलेल्या फार्मासिस्टद्वारे गोळ्या, औषधे दिले जातात. कोरोना रुग्णांना रोज प्राणायाम करायला सांगितला जातो. रुग्णांचे मनोरंजन व्हावे यासाठी बुद्धिबळ ठेवण्यात आले आहे. कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत नाशिक शहर व जिल्ह्यातील रुग्णांनी उपचार घेतले आहेत.
कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे व सेंटरमध्ये येणारे रुग्ण, तसेच डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांना वेगवेगळे प्रवेशद्वार ठेवले आहे. सदर कोविड सेंटरमध्ये पक्षाचे पदाधिकारी स्वतः जातीने लक्ष घालतात. पदाधिकारी वेळेनुसार कामकाज बघत आहेत. त्यात माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, दिलीप खैरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी काँग्रेसचे गौरव गोवर्धने, संजय खैरनार, कैलास मुदलियार, समाधान जाधव, अनिल परदेशी आदींसह पदाधिकारी दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत.
(फोटो ०९ एनसीपी)