मालेगाव स्टॅण्डवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर वार
By Admin | Updated: February 10, 2016 23:29 IST2016-02-10T23:27:54+5:302016-02-10T23:29:28+5:30
मालेगाव स्टॅण्डवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर वार

मालेगाव स्टॅण्डवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर वार
नाशिक : मालेगाव स्टॅण्डवर बुधवारी (दि़१०) दुपारच्या सुमारास एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मखमलाबाद नाक्यावरील उदय कॉलनीत राहणारे सतीश जगन्नाथ आमले (५९) हे दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास मालेगाव स्टॅण्डवरील सीपी टायर दुकानाजवळ उभे असताना एकाने धारदार हत्याराने त्यांच्यावर वार केले़ यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचे भाऊ अविनाश आमले यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या हल्ल्यानंतर आमले यांच्यावर वार करणारा इसम मालेगाव स्टॅण्ड पोलीस चौकीजवळ उभा असूनही पोलिसांनी त्यास वेळेवर न पकडल्याने रिक्षात बसून तो फरार झाला़ (प्रतिनिधी)